पूल कोसळल्यानंतर मानोरी-केंदळसाठी पर्यायी मार्ग सुरू

पूल कोसळल्यानंतर मानोरी-केंदळसाठी पर्यायी मार्ग सुरू

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

मुळा नदीवरील (Mula River) बंधार्‍या शेजारील जीर्ण झालेला पूल (Bridge) मुसळधार पावसाने (Heavy Rain) कोसळल्याने मानोरी-केंदळ (Manori-Kendal) या दोन गावांची वाहतूक ठप्प (Traffic jam in two villages) होऊन संपर्क तुटला होता. याबाबत तातडीने मुळा पाटबंधारे विभागाकडून (Mula Irrigation Department) या पडलेल्या पुलाची पाहणी करून वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

राहुरी (Rahuri) तालुक्याच्या पूर्वभागातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा मानोरी (Manori) केटीवेअर बंधारा (Dam) या बंधार्‍या शेजारील पूल (Bridge) अचानक झालेल्या पावसाने कोसळल्याने मानोरी-केंदळ (Manori-Kendal) या दोन गावांची वाहतूक ठप्प झाली. याबाबत मुळा पाटबंधारे विभागाच्या (Mula Irrigation Department) कार्यकारी अभियंता सायली पाटील (Sayali Patil), उप अभियंता अण्णासाहेब आंधळे, शाखा अभियंता शरद कांबळे आदींसह अधिकारी, पदाधिकारी यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. मुळा नदीवरील बंधार्‍या (Mula River Dam) शेजारील हा पूल (Bridge) गेल्या अनेक दिवसापासून जीर्ण झाला होता. सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात ओढे-नाले वाहू लागल्याने या पावसाच्या पाण्याने जीर्ण झालेला हा पूल अखेर कोसळला (Bridge finally Collapsed). पुलाचे काम लवकर मार्गी लागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी माजी उपसभापती रवींद्र आढाव, सरपंच अब्बास शेख, अण्णासाहेब तोडमल, उत्तम खुळे, गोकुळदास आढाव, चाँदभाई शेख, शामराव आढाव, लक्ष्मण आढाव, राजेंद्र आढाव, पंढरीनाथ आढाव, शिवाजी आढाव, उद्धव आढाव, गोरक्षनाथ गुंड, आदींसह नागरिक उपस्थित होते.

मानोरी- केंदळ या दोन गावांना जोडणार्‍या मुळानदी वरील बंधार्‍याशेजारील कोसळलेल्या पुलाची पाटबंधारे विभागाकडुन पाहणी करण्यात आली. दोन गावांची वाहतूक बंद झाल्याने संपर्क तुटला आहे. याबाबत येथील शेतकरी भाऊसाहेब गुंजाळ यांच्याशी चर्चा करून त्यांच्या शेतातून नळ्या टाकून वाहतुकीची व्यवस्था करण्यात येईल, पुलाच्या कामास मंजुरी आल्यावर व पावसाचे पाणी कमी झाल्यावर लवकरच काम सुरू करण्यात येईल.

- सायली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com