मनोज पाटील यांची मुंबई येथे उपायुक्तपदी बदली तर कडासने नागपुरात

खैरे नगरचे अप्पर पोलीस अधीक्षक || कडासने नागपुरात तर सुनीता साळुंके, दीपाली काळे, तेजस्वी सातपुते यांना पोलीस उपायुक्तपदी संधी
मनोज पाटील
मनोज पाटील

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तत्कालिन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची पोलीस उपायुक्त, मुंबई शहर येथे बदली झाली आहे. रिक्त असलेल्या नगरच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नागपूर येथील नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची नियुक्ती झाली आहे.

सोमवारी रात्री राज्य सरकारच्या गृह विभागाने राज्यातील पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्याबाबत आदेश काढले. मागील महिन्यात तत्कालिन जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांच्या जागी राकेश ओला यांची नियुक्ती करण्यात आली होती. अधीक्षक पाटील यांना मात्र पदस्थापना मिळाली नव्हती.

सोमवारी रात्री काढलेल्या आदेशामध्ये अधीक्षक पाटील यांची पोलीस उपायुक्त, मुंबई शहर येथे बदली झाली आहे. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची सिंधुदूर्ग येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाल्यानंतर ती जागा रिक्त होती. त्यांच्या जागी पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे (नागरी हक्क संरक्षण, नागपूर) यांची नियुक्ती झाली आहे.

कडासने नागपुरात तर सुनीता साळुंके, दीपाली काळे, तेजस्वी सातपुते यांना पोलीस उपायुक्तपदी संधी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नाशिक विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी कडासने यांची श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक पदाची कारकिर्द गाजलेली आहे. मुंबई महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधिक्षक सुनिता साळुंके-ठाकरे यांची मुंबई राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्तपदी वर्णी लागली आहे. त्यांनीही चार वर्षांपूर्वी श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक पदाची कामगिरी पार पाडलेली आहे.

नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमी पोलीस अधिक्षक दीपाली काळे यांची सोलापूर शहर पोलीस उप आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांनीही दोन वर्षांपूर्वी श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव मूळगाव असलेल्या आणि तेजस्वी बाळासाहेब सातपुते यांना मुंबई शहर पोलिस उपायुक्त पदाची संधी देण्यात आली आहे.

यापूर्वी त्या सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत होत्या. तसेच प्रवीण मुंडे यांनाही मुंबई शहर पोलिस उपायुक्त पदी नियुक्ती देण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी मुंडे यांनी श्रीरामपूर पोलीस उपअधिक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. नवी मुंबई मुख्यालय पोलीस उप आयुक्त अभिजीत शिवथरे यांची जालन्यात अपर पोलीस अधिक्षक पदी नियुक्ती देण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी शिर्डीत पोलिस उपअधिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com