पालिकेत गटनेते आपणच - पोटे

सर्वाधिक निधी देऊनही भोस असमाधानी
पालिकेत गटनेते आपणच - पोटे

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा नगरपालिकेत आपण आघाडीचे गटनेते आहोत. आगामी काळात येत असलेल्या तालुक्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमच्या गटातील काही नगरसेवकांनी गटबाजी - केली आहे. आपण पालिकेत काम करताना दुजाभाव कधी केला नाही तर गणेश भोस यांच्या प्रभागात विकासासाठी सर्वाधिक निधी दिलेला असल्याचे मनोहर पोटे यांनी सांगितले.

नगराध्यक्ष पती तथा काँगेसचे गटनेते मनोहर पोटे यांच्या विरोधात अविश्वास दाखवत गटनेते बदल करण्यासाठी आघाडीच्या पाच नगरसेवकानी जिल्हाधिकारी यांना अर्ज देत गणेश भोस यांची गटनेते म्हणून निवड केल्याचे पत्र दिले आहे.यावर बोलताना मनोहर पोटे म्हणाले, आपण नगरसेवकांना विश्वासात घेत नाही. हे कारण चुकीचे आहे. मागील साडेतीन वर्षांत सर्वात जास्त निधी गणेश भोस यांच्या वॉर्डात दिलेला आहे.

राजाभाऊ लोखंडे व संगीता मखरे हे दोन नगरसेवक राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले आहेत तरी ते आपल्यासोबत आहेत. आणि काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले विरोधात गेलेत. त्या सर्व नगरसेवकांच्या नाराजीचे कारण वेगळे आहे. कारण येणारे वर्ष तालुक्यातील अनेक संस्थात्मक निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. त्याचीच ही परिणीती आहे. योग्यवेळी पुराव्यासह आपण उत्तर देऊ यापुढे देखील मीच गटनेते पदी राहणार असल्याचा विश्वास नगरसेवक मनोहर पोटे यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com