मांजरसुंबाच्या सरपंचासह पाच सदस्यांचे सदस्यत्व कायम

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे आदेश
मांजरसुंबाच्या सरपंचासह पाच सदस्यांचे सदस्यत्व कायम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आदर्शगाव मांजरसुंबा (ता. नगर) येथील सरपंचासह पाच ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द प्रकरण जिल्हाभर गाजले असताना, यावर सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या समोर अंतिम सुनावणी होऊन तक्रारदारांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. या प्रकरणात सरपंचासह पाच ग्रामपंचायत सदस्यांना दिलासा मिळाला आहे.

आदर्शगाव मांजरसुंबा (ता. नगर) ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले ग्रामपंचायत सदस्य जालिंदर मच्छिंद्र कदम, सरपंच मंगल कदम, किरण कदम, कविता वाघमारे, प्रशांत कदम, रूपाली कदम या सहा सदस्यांविरोधात निवडणुकीचा खर्च मुदतीत सादर न केल्याप्रकरणी त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचा अर्ज रामनाथ गोविंद कदम व इतर तीन अर्जदारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे दाखल केला होता.

तक्रारदारांचा अर्ज नामंजूर करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. या आदेशाने विजयी उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या बाजूने अ‍ॅड. संकेत बारस्कर यांनी तर तक्रारदारांच्यावतीने अ‍ॅड. युवराज पाटील यांनी काम पाहिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com