
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील माणिकदौंडी घाटामध्ये रविवारी (दि.5) मध्यरात्री धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने उडीद घेऊन जाणारा दहा चाकी ट्रक पलटी झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान अपघातांची मालिका सुरू असून येथील धोकादायक वळणे दुरूस्त करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या महितीनुसार बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील कडा या ठिकाणाहून उडीदाचे पोते घेऊन ट्रक (क्र. केए 32 डी. 9668) मुंबईच्या दिशेने जात होता. माणिकदौंडीच्या धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटला त्यानंतर ट्रक मधील असलेले उडीदाचे पोते हे दरीत कोसळले गेले त्यामुळे उडीद डाळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
गेल्या आठ दिवसात याच घाटामध्ये अपघात होण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकांचे बळी जात आहे. माणिक दौंडीच्या धोकादायक असणार्या वळणाची त्वरित दुरुस्ती करून ठिकठिकाणी दिशादर्शक फलके लावण्याची मागणी माणिकदौंडी येथील समीर पठाण, माजी पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पवार, सुनिल ओव्हळ, शिवाजी मोहिते,अमोल शेळके, नय्युम पठाण,सतिश आठरे, राधाकिसन कर्डिले यांनी केली आहे.