दीड टन जिवंत मांगूर मासे पकडले

File Photo
File Photo

नेवासा |शहर प्रतिनीधी| Newasa

शासनाने बंदी घातलेले दीड टन वजनाचे तीन लाख रुपये किमतीचे मांगूर जातीचे मासे (Mangur Fish) व पिकअप जीप नेवासा पोलिसांनी (Newasa Police) गिडेगाव शिवारातून जप्त (Seized) केली असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.

File Photo
मंत्री विखेंचा जिल्हा नामांतराला विरोध

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र पांडुरंग वैद्य यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 03 जानेवारी रोजी सायंकाळी सव्वाचार वाजण्याचे सुमारास नेवासा (Newasa) तालुक्यातील गिडेगाव (Gidegav) येथे आरोपी पिकअप जीपचा चालक अमोल सुदाम म्हस्के (वय 28) रा. गोगलगाव ता. नेवासा तसेच शालीद मंगलभीम गायकवाड (वय 21) रा. गारखेडा ता. जामनेर जिल्हा जळगाव (Jalgav) हे दोघे आपल्या ताब्यातील पिकअप जीप (एमएच 17 एजे 6575) मध्ये मागील भागात ताडपत्रीमध्ये असलेले पाणी व त्यातील अंदाजे दिड टन वजनाचे शासनाने प्रतिबंध केलेले मांगूर जातीचे (Mangur Fish) जिवंत मासे 150 रुपये किलो दराचे (एकूण किंमत तीन लाख रुपये), एक पांढर्‍या रंगाची पिकअप जीप अंदाजे 5 लाख 25 हजार रुपये जप्त करण्यात आली.

File Photo
शेतकर्‍यांचे भाऊबंदकीचे वाद कायमचे मिटणार!

आरोपींना मासे (Mangur Fish) कुठे घेवून जात आहात ? असे विचारले असता त्यांनी भिगवन ता. इंदापूर जिल्हा पुणे येथे विक्री करण्यासाठी घेवून जात आहोत असे सांगीतले.

मत्स्य विकास विभागाच्या (Department of Fisheries Development) अधिकार्‍यांना बोलावून घेवून माशांबाबत खात्री केली असता भारतीय माशांचे प्रजातीला व पर्यावरणाला धोका निर्माण करणारे व त्याची विक्री व वाहतुक बंदी असलेले शासनाने प्रतिबंधीत केलेले मांगुर जातीचे मासे (Mangur Fish) आहेत. असा अभिप्राय त्यांनी दिला. शासनाचे आदेशाचा जाणीवपुर्वक भंग केला म्हणून दोघांवर भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

File Photo
नववर्षाच्या स्वागतानिमित्त साईचरणी 'एवढ्या' कोटींचे दान

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com