मांडओहोळ परिसरात एकावर गोळीबार

रोकड लुटण्यासाठी चौघा मजुरांनी केला हल्ला
मांडओहोळ परिसरात एकावर गोळीबार

पारनेर |प्रतिनिधी| Parner

तालुुक्यातील कर्जुले हर्या ते मांडओहळ धरण रस्त्यावर आज ( दि.27) भरदिवसा एकावर गोळीबार करून रोकड लूटण्याची घटना घडली. स्थानिक ग्रामस्थ व तरूणांनी पाठलाग करून हल्लेखोरांना पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान बांधकाम व्यावसायिकाकडील रोकड लूटण्यासाठी त्याच्याकडे कामाला असलेल्या मजुरांनीच हा हल्ला केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

मांडओहोळ परिसरात एकावर गोळीबार
धक्कादायक ! करंजीत भगरीच्या पिठाची भाकर खाल्ल्याने पंधरा जणांना विषबाधा

शक्ती नारायण राय, नितीश गुड्डूु (दोघेही परप्रांतीय, हल्ली राहणार राजूरी, जिल्हा पुणे) अशी पोलीसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे असून अन्य दोघे जण पसार झाली आहेत. या घटनेत म्हसोबा झाप येथील बांधकाम व्यावसायिक स्वप्नील आग्रे हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी आग्रे हे त्यांच्या चार चाकी वाहनातून जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याच्या वाहनावर गोळीबार केला.

मांडओहोळ परिसरात एकावर गोळीबार
श्रीरामपूर एमआयडीसी कंपनीतील लाखो रुपयांच्या लोखंडी प्लेटा चोरी

स्वप्नील आग्रे यांना गाडीच्या खाली टाकून कार घेऊन त्यांनी पळ काढला. दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच परिसरातील तरुणांनी पोखरीकडे जाणार्या रस्त्यावरील गावांमधील तरुणांना गाडीची व घटनेची माहिती दिली. यानंतर तरुणांनी सदर गाडी पोखरी परिसरात रोखली. गाडीतील तरुणांच्या हातात दोन गावठी कट्टे होते. या तरुणांना स्थानिक तरुण व ग्रामस्थांनी ताब्यात घेऊन चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलीसांच्या चौकशीदरम्यान, सदरचे हल्लेखोर तरुण हे स्वप्नील आग्रे यांच्याकडे गवंडी काम करत होते. आग्रे यांना आज मोठे पेमेंट मिळणार असल्याची माहिती हल्लेखोरांना मिळाली होती. ही रोकड लुटण्याच्या इराद्यानेच त्यांनी आग्रे यांच्यावर गोळीबार केला असावा असा अंदाज आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पारनेरचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप व सहकार्यांनी घटनास्थळ पाहणी करून. फरार झालेला हल्लेखारांचा शोध सुरू केला आहे. चौघा संशयितांवर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com