मांची शिवारात निमगावजाळीच्या तरुणाचा मृतदेह आढळला

मांची शिवारात निमगावजाळीच्या तरुणाचा मृतदेह आढळला
File Photo

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील (Sangamner) मांचीहिल (Manchihill) शिवारात मंगळवारी सकाळी भाऊसाहेब दत्तात्रय तळोले (वय 35) या तरुणाचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

File Photo
55 वर्षीय व्यक्तीचे अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास मांची शिवारातील हॉटेल पुरोहित जवळ वनविभागाच्या क्षेत्रात एक मृतदेह (Dead Body) असल्याची माहिती पोलिस पाटील दिलीप डेंगळे यांना फोनवरुन मिळाली होती. त्यामुळे घटनेचे गांभिर्य ओळखून दिलीप डेंगळे यांनी घटनेची माहिती पोलिसांना (Police) देऊन ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संगमनेर तालुका (Sangamner Taluka) पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक खंडीझोड यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

File Photo
गडाख, पाडवींच्या विरोधात अपक्ष आमदार संतप्त

दरम्यान स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी भाऊसाहेब तळोले याचा मृतदेह (Dead Body) शवविच्छेदनासाठी संगमनेर (Sangamner) येथिल कॉटेज रुग्णालयात पाठविला आहे. तळोले याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यामुळे ग्रामस्थांनी शोक केला आहे. दरम्यान तळोले याचा मृत्यू कशामुळे झाला ? की त्याचा कुणी घातपात केला याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.

File Photo
आधी नवीन जलसाठा निर्माण करा, मगच पठाराला पाणी द्या!
File Photo
पुणे-नाशिक मार्गावर दुसर्‍यांदा टोलवाढ

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com