10 लाख घेऊन मॅनेजर पसार

दीपक पेट्रोलपंपावरील घटना
10 लाख घेऊन मॅनेजर पसार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पेट्रोल पंपावरील मॅनेजरने 10 लाख 37 हजार 384 रूपये घेऊन पोबारा केला आहे. सावेडी उपनगरातील झोपडी कॅन्टीन येथील दीपक पेट्रोल पंपावर मंगळवारी ही घटना घडली. अ‍ॅगस्टीन जॉर्ज गोन्सालविस (वय 55 रा. ख्रिश्चन कॉलनी, तारकपूर) असे मॅनेजरचे नाव असून त्याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात भादंवि कलम 408 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंपाचे मालक अनिल भोलानाथ जोशी (वय 55 रा. मेघराज कॉलनी, सहकारनगर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

ऑगस्टीन जॉर्ज गोन्सालविस हा अनिल जोशी यांच्या मालकीच्या दीपक पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करत होता. दिवसभराची पेट्रोल पंपावरील सर्व रक्कम बँकेत जमा करण्याचे काम तो अनेक वर्षांपासून करत होता. त्यामुळे पेट्रोल पंपावरील सर्व व्यवहाराची रक्कम त्याच्याकडेच असायची. सोमवारी दिवसभर आणि मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत जमा झालेले नऊ लाख 97 हजार 384 व कामगारांच्या पगाराचे 40 हजार असे 10 लाख 37 हजार 384 रूपयाची रक्कम घेऊन तो पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com