
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्यातील वाढता मनुष्य आणि बिबट संघर्ष आणि बिबट्यांच्या मृत्यूची वाढलेली संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने समिती नेमली आहे. यात प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे.
मानवी वस्त्यांवर सातत्याने बिबट्याचे हल्ले होत आहेत. यात पशूधनाची हानी होत आहे. एवढेच नव्हेतर माणसांवरही हल्ले होत आहेत. यात काहींना जीव गमवावा लागत आहे. याचा परिणाम शेती कामावरही होत आहे. बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतमजूर, शेतकरी शेती कामावर जाण्यास धजावत नाही.
मानव बिबट्या संघर्षावर उपाययोजना सुचविण्यासाठी विधानसभा सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती बिबट्यांची वाढलेली संया, नागरी वस्तीमधील त्यांचा वाढलेला वावर व त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास याबाबत तसेच मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीत सर्वश्री आमदार समीर कुणावार, संजय कुटे, आशिष जैस्वाल, अशोक उईके, कृष्णा गजबे, प्रतिभा धानोरकर, मदन येरावार, अनिल बाबर, प्रकाश आबिटकर, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, अतुल बेणके, मानसिंग नाईक, सुनिल प्रभू, अशोक पवार यांचा समावेश आहे.