हात चलाखीने एटीएम कार्ड बदली करून ठकविणाऱ्यास अटक

एटीएम कार्ड बदली करुन तब्बल 26 हजार 500 रुपयाची फसवणूक
हात चलाखीने एटीएम कार्ड बदली करून ठकविणाऱ्यास अटक

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

हात चलाखीने एटएम कार्ड बदली करुन तब्बल 26 हजार 500 रुपये काढुन घेवुन व्यक्तीची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला नेवासा पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबद नेवासा खुर्द येथील पुंडलिक जालिदर लष्करे (वय 39 वर्षे) यांनी नेवासा पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, मी नेवासा फाटा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडीया एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी आलो असता मला एटीएममधून पैसे निघले नाही.एटीएम मधुन पैसे निघण्यास आडचण येत होती. तेवढयात तेथे 30 ते 35 वयो गटातील एक अनोळखी इसम एटीएम मध्ये आला व एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकुन पैसे काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पैसे निघाले नाही म्हणुन मी माझे एटीएम कार्ड त्याचे जवळुन घेवुन एटीएम मधुन पैसे निघत नसल्याने मी महाराष्ट्र ग्रामीण बैंक शाखा मुकींदपुर नेवासा फाटा ता नेवासा येथे जावुन 10 हजार रुपये काढले व घरी गेलो. त्यानंतर दि. 09 सप्टेंबर रोजी माझे खात्यातुन 26 हजार 500 रुपये कोणीतरी काढुन घेतले बाबत मला माझे मोबाईल वर मॅसेज आला. त्यानंतर मी मोबाईल चेक केले असता दि. 08 रोजी माझे खात्यातुन 20 हजार रुपये व दि. 09 रोजी 6 हजार 500 रुपये काढुन घेतल्याचे मेसेज आलेले होते परंतु दि. 08 रोजी मी कामात असल्याने माझे मोबाईलवर आलेला मॅसेज मी पाहीलेला नव्हता. त्यानंतर मी लगेच महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मुकींदपुर नेवासा फाटा ता.नेवासा येथे जावुन खात्री केली. नेवासा पोलिस ठाण्याचे बिट हवालदार बाळकृष्ण ठोंबरे व पो.कॉ.रवी पवार यांना समजताच आरोपीच्या शोधासाठी शनिवारी दुपार पासूनच टेहाळणी करु सुरु केली असता चार वाजता राजमुद्रा चौकातील स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या एटीएम जवळ पैसे काढणाऱ्या लोकांशी संपर्क करीत असलेल्या संशयिताला ताब्यात घेण्यासाठी पोलिस हवालदार ठोंबरे व पवार यांनी सापळा रचत धाड टाकली असता संशयित आरोपी व पोलिसांची चांगलीच झटापट झाली. यावेळी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपी हिसका देत असतांना सैन्य दलातील मेजर ज्ञानदेव बर्डे व ग्रामस्थांनी पोलिसांना मदत करत आरोपीला पकडून नेवासा पोलिसांनी या भामट्याला जेरबंद केले असता त्याच्याकडून 58 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल वसूल केला त्यामध्ये महाराष्ट्र बँकेचे एक एटीएम कार्ड, स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे 8, महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे 2, बंधन बँकेचे 1, अॅक्सीस बँकेचे 1, असे मिळून एकूण 9 एटीएम कार्ड व पल्सर मोटारसायकलच्या नंबर व चेसीची खाडाखोड केलेली एक मोटारसायकल असा मिळून 58 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत भामटा सनिदेवल विष्णू चव्हाण (वय 21) रा.मुद्येश वडगांव ता.गंगापूर जिल्हा औरंगाबाद याला अटक करण्यात नेवासा पोलिसांना यश आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com