कोपरगाव
कोपरगाव
सार्वमत

कोपरगाव - अवैध गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक

कोपरगाव, येवला परिसरात खळबळ उडाली आहे.

Nilesh Jadhav

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) - शहरातील नगर-मनमाड राज्यमार्गावर साईधाम कमानीजवळ पाटोदा ता.येवला येथील आरोपी नामदेव रामदास बोरणारे याला अटक करण्यात आली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी, आरोपी आपल्या मारुती गाडीत बसून आपल्याजवळ अवैध गावठी पिस्तूल बाळगून असल्याची गुप्त बातमी मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव शहर पोलिसानी टाकलेल्या धाडीत या आरोपी जवळील विक्रीसाठी असलेले एक पिस्तूल, एक मॅगझीन, जिवंत काडतुस, एक एम.आय.कंपनीचा मोबाईल असा ५ लाख ३६ हजार २०० रुपयांचा ऐवजासह आरोपी जेरबंद केला आहे. त्यामुळे कोपरगाव, येवला परिसरात खळबळ उडाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com