लोखंडी खांबात वीज प्रवाह उतरल्याने धक्का लागून बैलाचा मृत्यू

लोखंडी खांबात वीज प्रवाह उतरल्याने 
धक्का लागून बैलाचा मृत्यू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

लोखंडी पोलमध्ये उतरलेल्या विजेचा धक्का (Electric Shock) लागून बैलाचा जागीच मृत्यू (Bull Death) झाल्याची घटना राहाता (Rahata) तालुक्यातील ममदापूर (Mamdapur) म्हसे मळा येथे सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत या शेतकर्‍याचे (Farmer) सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणाचा दिगंबर पांडुरंग म्हसे या शेतकर्‍याला फटका बसला आहे.

लोखंडी खांबात वीज प्रवाह उतरल्याने 
धक्का लागून बैलाचा मृत्यू
धक्कादायक! पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या

ममदापूर (Mamdapur) परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला महावितरणचे (MSEDCL) लोखंडी पोल आहेत. काल सायंकाळी या परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस (Stormy Winds and Rain) झाला. त्यात काही लोखंडी पोलमध्ये वीजेचा प्रवाह उतरला. त्याच वेळी म्हसे मळा येथील शेतकरी दिगंबर पांडुरंग म्हसे हे आपल्या बैलगाडीसह शेतातील चारा आणण्यसाठी जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी पोलला बैलगाडीचा धक्का लागला. यावेळी पोलमध्ये वीज प्रवाह उतरलेला असल्याने बैलाला वीजेचा धक्का (Bull Electric Shock) लागला. त्यात बैलाचा जागीच मृत्यू झाला.

लोखंडी खांबात वीज प्रवाह उतरल्याने 
धक्का लागून बैलाचा मृत्यू
विद्युत तार अंगावर पडल्याने 7 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू !

या घटनेत बैलगाडी लाकडी असल्याने दुसरा बैल व त्यावरील शेतकरी म्हसे सुदैवाने बचावले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती महावितरणच्या अधिकार्‍यांना देण्यात आली. त्यानंतर महावितरण कंपनीचे ममदापूर सबस्टेशनचे अभियंता श्री. बेंडकुळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेश भालेराव, कामगार तलाठी राहुल मंडलिक, लोणी पोलीस ठाण्याचे श्री. साळवे यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. यावेळी शेतकरी संघटनेचे शिवाजी जवरे, योगेश पठाडे, रोहिदास उंडे, दादासाहेब म्हसे, प्रकाश म्हसे, गणेश म्हसे, शिवाजी उंडे, योगेश नारळे, नारायण म्हसे, सुभाष उंडे, अप्पासाहेब बेंद्रे, महेश उंडे, लक्ष्मण म्हसे यांच्यासह शेतकरी व ग्रमस्थ उपस्थित होते.

लोखंडी खांबात वीज प्रवाह उतरल्याने 
धक्का लागून बैलाचा मृत्यू
लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारे पिकअप वाहन विहिरीत कोसळले
लोखंडी खांबात वीज प्रवाह उतरल्याने 
धक्का लागून बैलाचा मृत्यू
गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल करणारा मुलगा श्रीगोंद्यातून ताब्यात
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com