ममदापूर येथील चारी नं 4 वरील पुलाला भगदाड ; ग्रामस्थांची पूल दुरुस्तीची मागणी

ममदापूर येथील चारी नं 4 वरील पुलाला भगदाड ; ग्रामस्थांची पूल दुरुस्तीची मागणी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राहाता तालुक्यातील ममदापूर येथील चारी नं 4 वरील पुलाची सिमेंट नळीफुटून रस्त्याच्या मधोमध मोठे भगदाड पडले आहे. सदर पुलाचे काम 2 वर्षांपुर्वीच झालेले असताना या 2 वर्षांच्या कालावधीमध्येच या पुलाची वाताहत झाली आहे.

या पुलाच्या दुरूस्तीसाठी ममदापूर ग्रामपंचायतीने उपविभागीय अधिकारी प्रवरा डावा कालवा सिंचन उपविभाग लोणी यांच्याकडे पत्राद्वारे सदर पूल दुरूस्तीची मागणी केली आहे.

दलित मित्र शब्बीर कुरेशी यांनी या पुलाच्या दुरूस्तीसाठी राहाता तहसील येथे आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला. तसा पत्रव्यवहार पाटबंधारे विभागाशी केला परंतु प्रवरा डावा कालवा सिंचन उपविभागीय अभियंता यांनी दलित मित्र शब्बीर कुरेशी यांना आपण आमरण उपोषण करू नये. पुलाचे दुरूस्तीचे काम तातडीने केले जाईल, असे आश्वासन दिले.

या पुलावरून ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी यांची कायम प्रवासाची वर्दळ असते. दुचाकी, चारचाकी वाहन चालविणे अवघड झाले आहे. या पुलाची सिमेंट नळी फुटून रस्त्याच्या मधोमध भगदाड पडल्यामुळे याठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता असल्यामुळे पुलाच्या दुरूस्तीचे काम लवकरात लवकर हाती घेण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com