भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्काराने ममता भांगरे सन्मानित

भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्काराने ममता भांगरे सन्मानित

अकोले |प्रतिनिधी| Akole

कृषी मंत्रालय, भारत सरकार संचलित प्रोटेक्शन ऑफ प्लांट्स व्हरायटीज अ‍ॅण्ड फार्मर्स राइट्स अ‍ॅथॉरिटीमार्फत पिकांच्या स्थानिक वाण संवर्धन आणि शाश्वत वापर यासाठी व्यक्तिगत पातळीवर दिला जाणारा प्लांट जीनोम सेव्हीयर फार्मर रिवॉर्ड हा राष्ट्रीय पातळीवरील दिला जाणारा मानाचा पुरस्कार तालुक्यातील अन्नमाता म्हणून देश आणि विदेशात प्रसिद्ध असेलल्या ममताबाई देवराम भांगरे यांना मिळाला आहे.

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान येथील मुख्यालयात भारताचे कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दीड लाख रुपये, मानपत्र, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमास अकोले तालुक्यातील कळसूबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण डगळे, संस्थेचे सदस्य बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, डॉ. विठ्ठल कौठाळे, संजय पाटील, जितीन साठे, योगेश नवले उपस्थित होते.

गेली 20 हून अधिक वर्षे ममताबाई यांनी स्थानिक बियाणे संवर्धन आणि वृद्ध यासाठी भरीव कार्य केलेले आहे. याची देशपातळीवर दखल घेतली गेली. त्यांनी भात पिकाच्या विविध वाणांंचे संरक्षण केलेले आहे. लाल रंगाचा लसूण, लांब व आरोग्यास पोषक असलेला दुधीभोपळा, डांगर भोपळा, मोहरी, भुईमूग, मका, विविध प्रकारचे परसबागेत लागवड योग्य भाजीपाला पिके, तेलबिया, डाळवर्गीय पिके यांच्या पारंपरिक वाणांचे संवर्धन केले आहे. अकोले तालुक्यात बायफ संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या स्थानिक जैवविविधता संवर्धन वृद्धी व प्रसार उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कळसूबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेच्या त्या सक्रिय सदस्या आहेत. त्यांनी सेंद्रिय शेतीचे व परसबागेत भरीव काम उभे केले आहे.

सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान विकसित करताना त्यांनी गांडूळ खतापासून बनविलेल्या गोळ्या व गांडूळ खत वापरून बनवलेले सीडबॉल शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेले आहे. त्यांचा हा प्रयोग देशभर गाजला. हा पुरस्कार त्यांना मिळाल्यामुळे तालुक्यातील जनतेत आणि शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com