पोलीस भरती परीक्षेत गैरप्रकार; इतर आरोपींची नावे समोर

तोफखाना पोलिसांकडून शोध सुरू
पोलीस भरती परीक्षेत गैरप्रकार; इतर आरोपींची नावे समोर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

औरंगाबाद कारागृह पोलीस शिपाई भरती परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी अटक केलेला आरोपी चरण उर्फ चरणसिंग देवचंद गुसिंगे याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली.तपासादरम्यान त्यांना मदत करणार्‍या इतर आरोपींची नावे समोर आली आहेत.

तोफखाना पोलीस या आरोपींचा सध्या शोध घेत आहेत. तसेच आरोपींकडून ताब्यात घेतलेल्या सिम कार्डद्वारे त्यांनी कोणाकोणाला पेपर पाठविला होता, याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सॅण्डलमध्ये मोबाईल लपवून मायक्रोफोन आणि अन्य एका डिव्हाईसच्या मदतीने परीक्षेचा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केल्याचा प्रकार शहरातील रेसिडेन्शियल ज्युनिअर कॉलेज परीक्षा केंद्रावर घडला होता.

दाखल गुन्ह्यात पोलिसांनी विकास पिरमसिंग बारवाल व त्याला साथ देणारा आधुनिक तंत्रज्ञान असलेले साहित्य उपलब्ध करून देणारा मुख्य आरोपी चरण ऊर्फ चरणसिंग देवचंद गुसिंगे यालाही पोलिसांनी जालना जिल्ह्यातून अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com