बँक घोटाळ्यात मालपाणीला अटक

नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी
बँक घोटाळ्यात मालपाणीला अटक

अहमदनगर | Ahmedagar

शहर सहकारी बँकेच्या बोगस कर्जप्रकरणात योगेश मालपाणी याला आर्थिक गुन्हे शाखेने आज अटक केली.

त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी या माहितीला दुजोरा दिला.

बँक घोटाळ्यात मालपाणीला अटक
बेपत्ता असलेल्या 'त्या' व्यक्तीचा मृतदेह मुळा धरणाच्या पाण्यात आढळला

शहर सहकारी बँकेने 17 कोटी 25 लाख रुपयांचे बोगस कर्ज वाटप केल्याने डॉ. शेळके व बँकेचे संचालक मंडळ यांच्यासह 25 जणांविरुद्ध फसवणुकीचे तीन गुन्हे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

या मशिनरींचा पुरवठा योगेश मालपाणी याच्यामार्फत झाला होता, हे तपासात पुढे आले आहे. यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com