किरकोळ वादातून हाणामारी करणारे नऊ अटकेत

माळीवाडा येथील घटना || दोन अल्पवयीन ताब्यात
किरकोळ वादातून हाणामारी करणारे नऊ अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माळीवाडा (Maliwada) परिसरातील बारातोटी कारंजा, शेरकर गल्ली येथे सोमवारी (दि.24) रात्री लहान मुलांचे वादातून (Dispute) दोन गटात झालेल्या हाणामारी (Two Group Fight) प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले आहेत.दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) रात्रीतून नऊ जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दोन अल्पवयीन मुले देखील ताब्यात घेतली आहे.

किरकोळ वादातून हाणामारी करणारे नऊ अटकेत
बारसू रिफायनरीसाठी सुरु असलेली दडपशाही आणि सर्वेक्षण तात्काळ थांबवा

शहरातील शेरकर गल्लीत लहान मुलांचे वादातून (Dispute) दोन गटात हाणामारीची (Two Group Fight) घटना घडल्याने एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अनिल कातकाडे, एलसीबीचे निरीक्षक दिनेश आहेर व त्यांचे पथक कोतवालीचे निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांचे पथक यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवून जमलेल्या दोन्ही गटाचे जमावास शांत रहाण्याचे अवाहन केले. जमाव मोठ्या प्रमाणावर असल्याने तात्काळ अधिक कुमक बोलावून जमाव पांगवून दोन्ही गटातील जखमींच्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

किरकोळ वादातून हाणामारी करणारे नऊ अटकेत
श्रीरामपुरात दोन गटामध्ये राडा कट्ट्यातून गोळीबार: एक अत्यावस्थ

सुरेखा आदिनाथ लगड (वय 40 रा. शेरकर गल्ली) यांच्या फिर्यादीवरून अबु सलीम इम्रान सय्यद, उजेस सय्यद, माजीद खान, आरबाज शेख, उमेर सय्यद, अबु सय्यद, फैज बागवान, ताहीर खान, साहील शफीक बागवान, ओजेर इसहाक सय्यद, माजीद मुर्तुजा शेख, जाफर रज्जाग बागवान व इतर सात ते आठ अनोळखी इसम यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दुसर्‍या गटातील अल्पवयीन (वय 17) मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून धिरज परदेशी, सागर आहेर, ओमकार भागानगरे, शुभम कोमाकुल, ओमकार घोलप, यश घोरपड, तेजय मराठे, तेजस नंदकुमार खाडे व इतर पाच ते सहा अनोळखी इसम यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

किरकोळ वादातून हाणामारी करणारे नऊ अटकेत
975 पोलिसांच्या होणार बदल्या

यांना झाली अटक

पोलिसांनी तात्काळ दोन्ही गटाचे मिळुन नऊ जणांना अटक केली आहे. यामध्ये शुभम उर्फ परश्या नागेश कोमाकुल, साहील शफिक बागवान, ओमकार पांडुरंग भागानगर, ओझेर इसहाक सय्यद, यश सुनील घोरपडे, माजिद मुर्तुजा शेख, तेजस उर्फ सोन्या चक्रधर मराठे, जाफर रज्जाक बागवान, तेजस नंदकुमार खाडे यांचा समावेश आहे. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दोन विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पसार झालेल्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

किरकोळ वादातून हाणामारी करणारे नऊ अटकेत
लहान मुलांच्या वादातून हाणामारी व दगडफेक

यांची कामगिरी

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त अधीक्षक खैरे, उपअधीक्षक कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक आहेर, कोतवालीचे निरीक्षक यादव, सहायक निरीक्षक विवेक पवार, उपनिरीक्षक सोपान गोरे, तुषार धाकराव, मनोज कचरे, अंमलदार संजय खंडागळे, राजेंद्र वाघ, तनवीर शेख, संदीप पवार, मनोज गोसावी, विश्वास बेरड, योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, योगेश खामकर, संदीप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, रवींद्र घुगासे, राहीत यमुल, भिमराज खर्से, मयुर गायकवाड यांच्या संयुक्त पथकाने ही कामगिरी केली आहे.

छोट्या वादातून मोठ्या घटना घडत असतात. एखादी छोटी घटना जरी घडली तरी कोतवाली पोलीस ठाणे येथे तक्रार द्यावी. समाधान न झाल्यास पोलीस निरीक्षक यांना स्वतः भेटावे, त्यावर कडक कायदेशीर करण्यात येईल, स्वतः कायदा हातात घेऊ नये. किरकोळ वाद जरी असेल तरी कोतवाली पोलिसांना कळवा, असे आवाहन निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com