माळीवाडा परिसरात ‘रात्रीस खेळ चाले’

अश्लिल हावभाव करणार्‍या चार महिला पोलिसांच्या ताब्यात
माळीवाडा परिसरात ‘रात्रीस खेळ चाले’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रात्रीच्या वेळी माळीवाडा बस स्थानक परिसरात, जिल्हा परिषद गेटच्या समोर रिक्षामध्ये बसून अश्लिल हावभाव करणार्‍या चार महिलांसह एका पुरूषाला कोतवाली पोलिसांच्या गस्ती पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस अंमलदार पल्लवी रोहोकले यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. 16) रात्री साडे नऊच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

रिक्षा चालक सिराजउद्दीन आलीमोद्दीन काझी (वय 40 रा. जुना मंगळवार बाजार, काझीवाडा) व चार महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे, पोलीस अंमलदार वैशाली पटारे, रोहोकले, तनवीर शेख, योगेश भिंगारदिवे, सुजय हिवाळे, दीपक मिसाळ यांचे पथक माळीवाडा बस स्थानक परिसरात गस्त घालत असताना त्यांना जिल्हा परिषद गेटच्या समोर एका रिक्षामध्ये (एमएच 16 सीई 0672) एक पुरूष व चार महिला रिक्षामधील स्पीकरचा मोठा आवाज करून रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या लोकांकडे पाहून अश्लिल हावभाव करत असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी त्या रिक्षाचालकासह महिलांना ताब्यात घेतले. त्या चारही महिला मुळच्या पश्चिम बंगाल येथील रहिवाशी असून त्या सध्या सावेडी उपनगरात राहत असल्याचे त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर समोर आले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com