माळीबाभूळगावला दरोड्याची हत्यारे जप्त

पाथर्डी पोलिसांची कामगिरी
माळीबाभूळगावला दरोड्याची हत्यारे जप्त

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील माळीबाभुळगाव शिवारात एका घरातून सुमारे दीड डझनहून अधिक वेवेगळ्या प्रकारचे दरोडा टाकण्यासाठी तसेच चोर्‍या करण्यासाठी लागणारी हत्यारे ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी जप्त केली आहेत. मात्र संशयित फरार होण्यात यशस्वी झाले.

पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगाव व खर्डे गावात रविवारी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या चोरीत दुलेचांदगाव येथील सदाशीव शंकर बांगर यांची घरफोडी, संपत त्रिंबक बांगर दोन बोकड तर खर्डे येथील म्हातारदेव रोडे यांची एक शेळी चोरी गेल्याची घटना घडली होती. या चोरीच्या घटना बद्दल काही ग्रामस्थांना कुणकुण लागली होती. ग्रामस्थ व पोलीस यांनी माळी बाभुळगाव शिवारातील एका घरावर छापा टाकला.

या छाप्यात पोलिसांना चोरी गेलेली एक शेळी, दोन बोकड या व्यतिरिक्त दोन दुचाकी, चोरी करण्यासाठी लागणारे हत्यारे यामध्ये टामी, कटवणी, पक्कड, स्क्रू ड्रायव्हर, टोकदार गज, लाईटची बॅटरी, लोखंडी तार कापण्यासाठी लागणारी पक्कड, चाकू, सत्तुर, कातर, कोयता, सुरी, कानस, हातोडी, नट बोल्ट खोलण्यासाठी लागणारे पान्हे व हेक्सॉ ब्लेड असे असे दीड डझनहून अधिक वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे व अवजारे पोलिसांनी घरातून ताब्यात घेतली आहे. या छाप्यात मिळालेले एक शेळी व दोन बोकडे फिर्यादींच्या ताब्यात पोलिसांनी दिले आहेत.

पोलीस नाईक संदीप कानडे, ईश्वर गर्जे यांनी हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी घटनास्थळी जाऊन व परिसरात आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलीस व ग्रामस्थांना पाहताच येथे असलेले संशयित पळून गेले.पाथर्डी शहर व तालुक्यात शेतातील मोटर, शेतकर्‍यांच्या शेळ्या, बंदिस्त घरफोडी व इतर छोट्या मोठ्या चोर्‍यांचा या चोरांनी उच्चाद मांडला आहे. शेतकर्‍यांसह सर्वसामान्य लोक या वाढत्या चोर्‍यांना वैतागले आहेत.पोलिसांनी यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com