माळीबाभुळगाव येथे चौकात अवैध दारू विक्री

पोलिसांनी कारवाई करण्याची महिलांची मागणी
माळीबाभुळगाव येथे चौकात अवैध दारू विक्री

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी|Pathardi

पाथर्डी शहरालगत असलेल्या माळीबाभुळगाव येथे चौकात अवैध दारुविक्री होत असून दारुड्यांमुळे संसार उद्ध्वस्त झालेत. पोलिसांनी गावातील अवैध दारुविक्री बंद करावी, अशी मागणी येथील महीलांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील यांच्याकडे भेट घेऊन केली आहे.

रविवारी माळीबाभुळगाव येथील महीला अंजना तिजोरे, काजल पवार, रजंना फाजगे, अनिता पवार, वंदना तिजोर, अजिता वंसत पवार, मंगल तिजोरे, कमल पवार, पुजा तिजोरे, निशा पवार, अर्चना पवार, मथाबाई पवार, वैशाली फाजगे, लिला तिजोरे, जुबेदा शेख, मालन शेख, शोभा तिजोरे, संगीता पवार, ज्योती पवार, सुरेखा काळे, संगीता नन्नवरे, वि.रा.तिजोरे, कमल फाजगे, लक्ष्मी फाजगे यांनी पोलीस ठाण्यात येऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील व ठाणे अमंलदार अरविंद चव्हाण यांची भेट घेतली.

यावेळी महिलांनी दारुमुळे गावचे गावपण हरपले असून व्यसनाधीनतेमुळे युवकांचे आयुष्य संपले आहे. भर चौकात मुलींची व महीलांची छेड काढली जाते, असे सांगून दारू विक्री थांबविण्याची मागणी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील यांनी अवैध दारुविक्रेत्यांवर कठोर कारवाई करू असे सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com