मल्हारवाडीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

मल्हारवाडीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

चुलत्याच्या घरी झोपण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला (Minor Girl) आकाश डोंगरे या आरोपीने (Accused) पळवून नेले. ही घटना राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) मल्हारवाडी (Malharwadi) परिसरात घडली. राहुरी पोलिसांकडून (Rahuri Police) त्या अपहरण (Abduction) झालेल्या मुलीचा शोध सुरू आहे.

दरम्यान, राहुरी तालुक्यातून गेल्या महिन्याभरात 10 हून अधिक अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले असून याबाबत तपास करण्यात राहुरी पोलीस अपयशी (Rahuri Police Failed) ठरले आहेत.

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) मल्हारवाडी (Malharwadi) परिसरात एक 17 वर्षे 7 महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी (Minor Girl) तिच्या कुटुंबासह राहत आहे. दि. 1 मे रोजी रात्री ती अल्पवयीन मुलगी तिच्या चुलत्याच्या घरी झोपण्यासाठी गेली होती. रात्रीच्या दरम्यान ती घरातून बेपत्ता झाली. घरातील इतर लोक सकाळी उठल्यानंतर ही घटना त्यांच्या लक्षात आली. अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी त्या मुलीचा परिसरात खूप शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. आपल्या मुलीला आरोपीने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी राहुरी पोलिसांत (Rahuri Police) धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.

अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसात (Rahuri Police) दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आकाश विश्वनाथ डोंगरे रा. मल्हारवाडी, ता. राहुरी याच्या विरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार हनुमंत आव्हाड हे करीत आहेत. या घटनेमुळे मल्हारवाडी परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.