पाथर्डी : मालेवाडी गावामध्ये बिबट्याचा शिरकाव

शेळ्या मेंढ्या खाल्याने शेतकर्‍यांचे नुकसान
पाथर्डी : मालेवाडी गावामध्ये बिबट्याचा शिरकाव

खरवंडी |कासार वार्ताहार| Kharwandi

भगवानगड पंचक्रोशीतील मालेवाडी गावामध्ये दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे.

मालेवाडी गावातील पवळागड वस्तीवर बिबट्याने दहशत निर्माण केली असुन शेतकर्‍यांच्या शेळ्या, मेंढ्या फस्त केल्या आहेत.

त्यातच बिबट्याने पवळागड वस्तीवर शेतकर्‍यांच्या घराबाहेर मुक्काम ठोकल्याने पवळागड वस्तीमधील शेतकर्‍यासह भगवानगड परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यामुळे पुढील जिवितहानी होण्यापुर्वी वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी विठ्ठल किर्तने व परिसरातील नागरीकांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com