माळेवाडीत शेतकर्‍याची आत्महत्या

आठ लाख रुपये बँकेचे कर्ज; बँकेचा तगादा
माळेवाडीत शेतकर्‍याची आत्महत्या

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील माळेवाडी येथील वृध्द शेतकर्‍याने विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर बँकेचे आठ लाख रुपये कर्ज होते. बँकेकडून नोटीस मिळाल्यानंतर त्याने पाच दिवसांपूर्वी विषारी पदार्थ सेवन केले होते. काल औषधोपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, सून व नातू असा परिवार आहे.

मोहन बंडू वाघ (वय 75) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. मोहन वाघ हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या एका पायाची शस्त्रक्रियाही झालेली होती. त्यांचा एक मुलगा पाच सहा वर्षापूर्वी मयत झाला होता तर दुसरा मुलगा सात ते आठ महिन्यांपूर्वी मरण पावला होता.

मोहन वाघ यांना काही दिवसांपूर्वी एका बँकेकडून कर्ज भरा म्हणून वकिलामार्फत नोटीसही आली होती. त्यांच्यावर किमान सात ते आठ लाख रुपये कर्ज होते. वसुलीसाठी त्यांना वारंवार बँकेतून फोनही येत होते.त्यामुळे त्यांनी विषारी पदार्थ सेवन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली. दरम्यान याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com