स्नेहालयातर्फे ऑनलाइन प्रश्‍न मंजुषा स्पर्धा

स्नेहालयातर्फे ऑनलाइन प्रश्‍न मंजुषा स्पर्धा

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - आंतरराष्ट्रीय 'मलाला दिवसा'च्या (Malala Day) निमित्ताने १२ जुलैला स्नेहालय (Snehalaya) संस्थेने ऑनलाइन प्रश्‍न मंजुषा स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती संयोजक जॉयस कॉनोली आणि संगीता सानप यांनी दिली.

'दरवर्षी बालिकांच्या शैक्षणिक समानता याविषयी प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन स्नेहालय संस्थेतर्फे केले जाते. यावर्षी देखील एक अनोखा कार्यक्रम ऑनलाइन आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी सर्वाना आमंत्रित करीत आहोत.

सहकुटुंब अथवा एकट्याने या प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत भाग घेता येईल. या स्पर्धेत स्नेहालयातील बालके त्यांच्या काही आवडत्या आणि लोकप्रिय चित्रपटांमधील गाणी सादर करतील ज्यावरून स्पर्धकांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. या कोविड काळात स्नेहालयातील बालके, तसेच सर्वांसाठी अतिशय उत्तम करमणुक यानिमित्ताने स्नेहालय परिवार घेऊन येत आहे. सोमवारी (१२ जुलै) संध्याकाळी 7.30 वाजता या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे', अशी माहिती संयोजक जॉयस कॉनोली आणि संगीता सानप यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com