अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करा

आ. काळेंच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना
अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

मागील काही दिवसांपासून कोपरगाव विधानसभा मतदार संघात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे महसूल विभागाकडून बहुतांश पंचनामे करण्यात आले असून पंचनामा करण्याच्या प्रक्रिया अजूनही मतदार संघात सुरू आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे ज्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे तसेच जिल्हा परिषदेमार्फत बांधण्यात आलेल्या अनेक पूल व छोट्या-मोठ्या बंधार्‍यांचे देखील या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना आ.आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व पंचायत समिती प्रशासनाला दिल्या आहेत.

गत दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे ही समाधानाची बाब असली तरी मतदार संघातील अनेक गावांत अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून रवंदा मंडलात मंगळवारी 69.5 मिमी पावसाची नोंद झाली. मतदार संघातील इतर गावांत देखील अतिवृष्टी झाली आहे. दोन वर्षांपूर्वी कोपरगाव विधानसभा मतदार संघात झालेल्या नुकसानीची शेतकर्‍यांना 27.95 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळवून दिलेली असून शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना व नागरिकांना देखील 95 लाखांची नुकसान भरपाई मिळवून दिली आहे. चालू वर्षी देखील परतीचा पाऊस मतदार संघात अपेक्षेपेक्षा जास्त पडल्यामुळे खरिपाचे नुकसान झाले आहे.

त्याचबरोबर या अतिवृष्टीचा मतदार संघातील रस्त्यांना देखील मोठा फटका बसला असून जिल्हा परिषदेच्या मार्फत बांधण्यात आलेले छोटे पूल व छोटेमोठे बंधारे बांधण्यात आले आहेत. त्या बंधार्‍यांचे देखील नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव तयार करून शासनाकडे त्वरित सादर करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत. शेतकर्‍यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देता येणार आहे. तसेच अतिवृष्टीमुळे ज्या रस्ते, पूल व छोट्या-मोठ्या पुलांना हानी पोहोचली आहे त्यांचे देखील झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव तयार करावेत. या रस्त्यांच्या व पुलांच्या दुरुस्तीसाठी देखील शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करून जास्तीत जास्त निधी मिळवणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com