अहमदनगर (प्रतिनिधी) -

मकरसक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना उच्च व लघु दाबाच्या वीजवाहिन्या, फिडर, वीज यंत्रणापासून सुरक्षित अंतर ठेवावे, सावधगिरी बाळगावी

व विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळावेत असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात पतंग आणि धागा विक्रीचे दुकाने सर्वत्र थाटली असून दिवसेदिवस आकाशातही रंगीबिरंगी पतंगांची गर्दी वाढणार आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येवू नये मांजाचा वापर टाळून नियमाचे पालन करीत पतंग उडविताना सुरक्षितता व सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

पतंग उडवितांना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकलेले पतंग काठ्या, लोखंडी सलाखी, किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करू नये. ते जीवावर बेतू शकते त्यामुळे जरा जपूनच असे आवाहन महावितरणने केले आहे.