पतंगबाजांनो सांभाळा, शॉक आहे तिथे!

वीजवाहिन्यांपासून सावधानतेचे आवाहन
पतंगबाजांनो सांभाळा, शॉक आहे तिथे!

अहमदनगर (प्रतिनिधी)

मकरसंक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना उच्च व लघु दाबाच्या वीजवाहिन्या, फिडर व वीज यंत्रणापासून सुरक्षित अंतर व सावधगिरी बाळगावी व विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पतंगबाजांनो सांभाळा, शॉक आहे तिथे!
PHOTO : मुकेश अंबानींकडून अलिशान हॉटेलची खरेदी; तब्बल ७३५ कोटींची गुंतवणूक

पतंग आणि धागा विक्रीचे दुकाने सर्वत्र थाटली असून दिवसेंदिवस आकाशातही रंगीबिरंगी पतंगांची गर्दी वाढणार आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येऊ नये मांजाचा वापर टाळून नियमाचे पालन करीत पतंग उडविताना सुरक्षितता व सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात वीज वितरणच्या लघु व उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले असते.

पतंगबाजांनो सांभाळा, शॉक आहे तिथे!
Irrfan Khan Birth Anniversary : आठवणीतला इरफान खान…

अनेकदा पतंग उडविताना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकतात. अशावेळी ते अडकलेले पतंग काठ्या, लोखंडी सलाखी, किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करतात. अश्यावेळी अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होवून जीवावर बेतू शकते त्यामुळे असे प्रयत्न करू नये. अनेकदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात विजेचा भीषण अपघात होऊ शकतो. मांजा ओढतांना एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होवून शॉर्टसर्किटमुळे अपघात होवून वीजपुरवठा खंडित होवू शकतो.

पतंगबाजांनो सांभाळा, शॉक आहे तिथे!
Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडेच्या मनमोहक सौंदर्याची नेटकऱ्यांना भुरळ

प्रामुख्याने शहरासह ग्रामीण भागातही वीज यंत्रणा सर्वत्र अस्तिवात आहेत. वीज वाहिन्यांच्या परीसरात नागरिक आणि लहान मुले पतंग उडवितात. अनेक पतंग या विजवाहिन्यामध्ये किंवा इतर यंत्रणेत अडकतात व यावेळी पतंग काढताना अनेकवेळा अपघात घडतात. मांजा वापरण्यावर कायदेशीर बंदी असून या मांजावर धातुमिश्रितरसायनाचे कोटिंग केलेले असल्यामुळे त्यातून वीज प्रवाह संचार करू शकतो. असा मांजा विद्युत तारेला अडकताच विद्युत यंत्रणेमध्ये विघाड होऊन संबंधित भागातील वीज पुरवठा खंडित होऊ शकतो व त्याचबरोबर अपघाताची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, त्यामुळे कुठलाच मांजा वापरु नये. नागरिक आणि लहान मुलांनी वीज वाहिन्या, वीज यंत्रणा असलेल्या परिसराऐवजी सुरक्षित आणि मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पतंगबाजांनो सांभाळा, शॉक आहे तिथे!
Katrina and Vicky : विकी-कतरिनाच्या हळदीचे फोटो पाहिलेत का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com