माका व महालक्ष्मीहिवरे येथे दिडशे एकरावर उन्हाळी सोयाबीन पिकाचा प्रयोग यशस्वी

माका व महालक्ष्मीहिवरे येथे दिडशे एकरावर उन्हाळी सोयाबीन पिकाचा प्रयोग यशस्वी

बालाजीदेडगाव |वार्ताहर| Balajidedgav

नेवासा तालुका कृषी अधिकारी तसेच मंडळ कृषी अधिकारी घोडेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली माका, महालक्ष्मी हिवरे, गावांमध्ये 150 एकर उन्हाळी सोयाबीन पिकाचा प्रथमच प्रयोग करण्यात आला असून तो पूर्णतः यशस्वी झाला असल्याचे कृषी सहाय्यक रुपेश पवार यांनी सांगितले.

शेतकर्‍यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे. शास्त्रज्ञ क्षेत्रभेट, शेतकर्‍यांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे माहिती देणे अशा वेगवेगळ्या माध्यमाद्वारे शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पादन वाढवण्यावर भर देण्याचे काम कृषी विभाग करत आहे. महालक्ष्मी हिवरेचे भगवानराव गंगावणे यांनी आपल्या शेतात पाच एकर फुले संगम या उन्हाळी वाणाची पेरणी केली असून पीक अतिशय जोमदार आले आहे. प्रतिझाड सुमारे 80 ते 110 शेंगा लागलेले दिसून येतात. भगवानराव गंगावणे यांनी सांगितले की, पेरणीची योग्य वेळ ही 15 डिसेंबर ते 10 जानेवारी आहे.

त्याचबरोबर योग्य पाणी नियोजन करणे (रात्री पाणी देणे) आणि खतांचे व कीटकनाशकांचे नियोजन केल्यास कमीत कमी कालावधीत व कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून भविष्यात सोयाबीनकडे शेतकर्‍यांनी पहावे. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे, मंडळ कृषी अधिकारी श्री. सोनवणे, कृषी पर्यवेक्षक ढोकणे, कृषी सहायक रुपेश पवार यांचे वेळोवेळी क्षेत्र भेटीद्वारे मार्गदर्शन लाभले.

Related Stories

No stories found.