माझी वसुंधरा : सर्वोत्तम कामगिरीबद्दल सोनई ग्रामपंचायतीचा गौरव

माझी वसुंधरा : सर्वोत्तम कामगिरीबद्दल सोनई ग्रामपंचायतीचा गौरव

सोनई |वार्ताहर| Sonai

‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत (Majhi Vasundhara Abhiyan) भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा (Competition of Local Self-Governing Bodies) घेण्यात आली. या स्पर्धेअंतर्गत ग्रामपंचायत गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या सोनई ग्रामपंचायतीचा (Sonai Grampanchayat) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) गौरव करण्यात आला.

माझी वसुंधरा : सर्वोत्तम कामगिरीबद्दल सोनई ग्रामपंचायतीचा गौरव
मशागती पूर्ण करुन शेतकरी करताहेत पावसाची प्रतिक्षा

सोनई ग्रामपंचायतीस (Sonai Grampanchayat) महाराष्ट्र राज्य पर्यावरण वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat), पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray)यांच्या हस्ते मुंबई येथे 5 जून रोजी सरपंच धनंजय वाघ, ग्रामसेवक संदीप वाडेकर व ग्रामपंचायत सदस्यांनी बक्षीस स्वीकारले.

माझी वसुंधरा : सर्वोत्तम कामगिरीबद्दल सोनई ग्रामपंचायतीचा गौरव
‘माझी वसुंधरा अभियानात’ पाच ग्रामपंचायती अव्वल

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातून पर्यावरणाविषयी उपक्रम राबविण्यात आलेले आहे. जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व मुळा एज्युकेशन, सर्व शाळा, सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिकांसह यशवंत सामाजिक प्रतिष्ठान वाढदिवसाच्या दिवशी मोरेचिंचोरे येथे वाढदिवसाला एक झाड उपक्रम राबविण्यात येत असतो. या सर्व उपक्रमाणे मुळा संस्था ते घोडेगाव व शिंगणापूरपर्यंत दुतर्फा, मुळा संस्थेच्या परीसरात झाडे लावली व त्याचे संगोपन केल्यामुळे परीसर हिरवाईने दाटून गेला आहे.

वृक्षारोपण करून त्यांचं संगोपन स्वतःच्या मुलाप्रमाणे करा ही गडाख साहेबांची शिकवण प्रत्येक सोनईकरांनी आत्मसात केल्यामुळेच सोनई ग्रामपंचायतीला बक्षीस मिळाले.

- धनंजय वाघ सरपंच, सोनई

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com