शिर्डी नगरपंचायतची पुरस्काराची परंपरा कायम राहील- नगराध्यक्ष गोंदकर

शिर्डी नगरपंचायतची पुरस्काराची परंपरा कायम राहील- नगराध्यक्ष गोंदकर

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

पूर्वीच्या शिर्डीत (Shirdi) आणि सध्याच्या शिर्डीत अमुलाग्र बदल झाला असून स्वच्छ भारत अभियान 2018 (Swachh Bharat Abhiyan 2018) स्पर्धेत स्वच्छ शहरांमध्ये राज्यात दुसरा तर देशात तिसर्‍या क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. शिर्डीकरांच्या सहभागामुळे माझी वसुंधरा अभियानात (Majhi Vasundhara) राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. आता सर्वांनी मिळवून ठरवले तर 2022 अंतर्गत अभियानात शिर्डी शहराला भारतात प्रथम क्रमांक मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करत यापुढेही माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrushan Vikhe Patil) यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगरपंचायतची पुरस्काराची (Award) परंपरा कायम राहील, असा विश्वास नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर (Shivaji Gondkar) यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाच्या माझी वसुंधरा (Majhi Vasundhara) अभियानांतर्गत शिर्डी नगरपंचायतीस राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर (first prize in the state was announced) झाला आहे. याबद्दल नगराध्यक्ष श्री. गोंदकर यांचा शहरातील ग्रिन एन क्लिन शिर्डी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrushan Vikhe Patil) तसेच खा. डॉ. सुजय विखे पाटील (MP Sujay Vikhe Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहराची वाटचाल स्वच्छ शहराबरोबरच हरीत शहर म्हणून नावारूपास आली असून आगामी वर्षात नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात चाळीस हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प (Determination to plant trees) केला आहे.

यासाठी नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष पुढाकार घेऊन वृक्षारोपण सुरू (Plantation started) केले आहे. वृक्षारोपणसह शहर सुंदर दिसावे यासाठी शहरातील 17 चौकात अतिशय सुरेख असे विविध प्रकारचे स्टँच्यु बसविण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. शिर्डीकरांनी शहरात झालेला अमुलाग्र बदल स्विकारल्यामुळे आपल्याला यंदाचा राज्यस्तरीय माझी वसुंधरा त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस शंभर टक्के मिळेल, असेही श्री. गोंदकर यांनी सांगून शिर्डीकरांना धन्यवाद दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com