पाण्याची पुन्हा बोंब

लिकेज दुरूस्तीमुळे पुरवठा विस्कळीत
पाण्याची पुन्हा बोंब

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरास पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी (Main Aqueduct Supplying Water) बाभळगावजवळ लिक (like) झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत (Water supply Disrupted) झाला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून वारंवार विस्कळीत होणार्‍या पुरवठ्यामुळे शहरात पाणी पुरवठ्याची (Water supply in the city) बोंब झाली आहे.

मंगळवार सकाळी 11 वाजेच्या सुमारास अहमदनगर शहरास पाणीपुरवठा (Water supply) करणारी नवीन मुख्य 1100 एम.एम. जलवाहिनी बाभळगाव (Bhabalgav) शिवारात पवार वस्तीजवळ पाण्याच्या व हवेच्या दाबाने लिक (Leaks) झाली. जलवाहिनी दुरूस्तीसाठी मुळानगर येथून होणारा पाणी उपसा बंद करण्यात आला. सायंकाळी उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, असे महापालिकेने (Ahmednagar Municipal Corporation) म्हटले आहे. या काळात मुळानगर (Mulanagar), विळद (Vilad) येथून होणारा पाण्याचा उपसा बंद असल्याने शहर पाणी वितरणाचे जलकुंभ भरता येणार नाही. त्यामुळे मंगळवार, 15 रोजी पाणी वाटप सुरु असलेल्या सावेडी (Savedi) उपनगरातील गुलमोहर रोड (Gulmohar Road), पाईपलाईन रोड (Pipeline Road), लक्ष्मीनगर (Laxminagar), सुर्यनगर (Suryanagar), निर्मलनगर (Nirmalnagar), मुकुंदनगर (Mukundnagar) तसेच स्टेशन रोड, विनायकनगर, आगरकर मळा (Agarkar Mala), कायनेटीक चौक परिसर, नगर-कल्याण रोडवरील (Nagar-Kalyan Road) शिवाजीनगर परिसर आदी भागास सकाळी 11 नंतरच्या रोटेशननुसार पाणी वाटप झाले नाही.

या भागात 16 रोजी पाणीपुरवठा होईल. बुधवार, 16 रोजी शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्ली गेट, नालेगाव, चितळे रोड, ख्रिस्तगल्ली, माळीवाडा (काही भाग), माणिक चौक, आनंदी बाजार, जुने मनपा कार्यालय परिसर, पंचपीर चावडी, बालिकाश्रम रोड परिसर इत्यादी भागास रोटेशननुसार पाणीपुरवठा होणार नाही. या भागातील पाणीपुरवठा गुरुवार, 17 मार्च रोजी करण्यात येईल. त्याचप्रमाणे गुरुवार, 17 रोजी मंगलगेट, रामचंद्र खुंट, कोठला, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको, सावेडी, सारसनगर व बुरुडगावरोड या भागातील पाणीपुरवठा रोटेशननुसार होणार नाही. त्याऐवजी शुक्रवार, 18 मार्च रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल, असे महापालिकेने कळविले असून नागरिकांना काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com