संगमनेर (प्रतिनिधी) -

संगमनेर नगर परिषदेच्या सन 2020-2021 वर्षाकरिता विविध विषयांच्या समित्यांच्या सभापती पदाची निवड नुकतीच

करण्यात आली. संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष कुंदन लहामगे, पक्षप्रतोद विश्वासराव मुर्तडक, ज्येष्ठ नगरसेवक दिलीपराव पुंड, तसेच नगरसेविका सोनाली शिंदे, रूपाली औटी, सुनंदाताई दिघे बाळासाहेब पवार, शबाना बेपारी, आरीफ देशमुख, नूरमुहम्मद शेख, किशोर पवार, सुहासिनी गुंजाळ, मनिषा भळगट, नितीन अभंग, प्रियंका भरीतकर, राजेंद्र वाकचौरे, मालतीताई डाके, शैलेश कलंत्री, नसीम बानो पठाण, हिरालाल पगडाल, वृषाली भडांगे तसेच मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर उपस्थित होते.

यावेळी सार्वजनिक बांधकाम समितीपदी सुनंदाताई दिघे, स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीपदी मनीषा भळकट, पाणी पुरवठा सभापती मालतीताई डाके, महिला व बालकल्याण समितीपदी शबाना बेपारी, महिला व बालकल्याण समितीपदी सुहासिनी गुंजाळ, शिक्षण समिती सभापतिपदी वृषाली भडांगे, नियोजन आणि विकास समिती सभापती पदी कुंदन लहामगे तसेच स्थायी समिती सदस्यपदी दिलीपराव पुंड, विश्वास मुर्तडक, नसीमबानो पठाण यांची निवड झाली आहे.

यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सभापतींनी पदभार स्विकारला.