माहेगाव सोसायटीत 12 संचालक बिनविरोध; एक अपात्र

माहेगाव सोसायटीत 12 संचालक बिनविरोध; एक अपात्र

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील माहेगाव सहकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत 13 संचालकांपैकी 12 संचालक बिनविरोध तर 1 अपात्र झाले आहेत. यावेळी सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील पंकज आढाव होते.

दि. 30 एप्रिल रोजी होणार्‍या निवडणुकीत अंतिम तारखेच्या दिवशी 31 मार्च रोजी एकूण 33 अर्ज दाखल झाले होते. पैकी सर्वसाधारण कर्जदार 20, महिला प्रतिनिधी 7, भटक्या विमुक्त जाती/जमातीत 2, इतर मागास प्रवर्ग 3 तर अनुसूचित जाती/जमातीमधून लहू साळवे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांना अपात्र ठरविले आहे. त्यामुळे ही जागा रिक्त राहिली. पैकी सुरेश थेवरकर, अशोक आढाव, बाबासाहेब देठे, राजेंद्र आढाव, काकासाहेब देठे, संभाजी थेवरकर, तात्याभाऊ कवडे, रामदास थेवरकर, शिवाजी थेवरकर, बाळासाहेब ढोबळे, कविता थेवरकर, मंगल थेवरकर या 12 संचालकांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी आप्पासाहेब थेवरकर, ज्ञानदेव देठे, ज्ञानदेव थेवरकर, संदीप मुंगसे, उद्धव थेवरकर, निवृत्ती थेवरकर, रंभाजी कावरे, दत्तात्रय आढाव, रामभाऊ गाडे, गणेश थेवरकर, नानासाहेब कवडे, माऊली कवडे, गणेश कवडे, सुभाष देठे, बाळासाहेब थेवरकर, अनिल थेवरकर, किशोर आढाव, आप्पासाहेब देठे, किशोर थेवरकर, बाबासाहेब आहेर, राजेंद्र थेवरकर, योगेश आढाव, रवींद्र काळे, सागर आढाव, विजय देठे, आकाश आढाव, सागर मोरे, माऊली गलांडे, विशाल थेवरकर, ऋषी गोरे, राजेंद्र हापसे, मच्छिंद्र थेवरकर, डॉ. विशाल मुंगसे, सचिव पोपट बोंबले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन काकासाहेब देठे यांनी केले.

Related Stories

No stories found.