माहेगावला कालव्यावरील पुलाला भगदाड

माहेगावला कालव्यावरील पुलाला भगदाड

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील माहेगाव शिवारामध्ये कालव्यावरील पुलाला दोन ठिकाणी मोठं भगदाड पडले आहे. त्यामुळे याठिकाणी भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची संभावना आहे. त्यामुळे प्रशासनाने या बाबीकडे तात्काळ दखल घेऊन या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी लाभधारक शेतकर्‍यांनी केली आहे. अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करत ग्रामसेवकांना दोन गावांचा कारभार असल्याने तेही वेळेवर भेटत नाही. त्यामुळे याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. या पुलावरून विद्यार्थी, शेतकरी दैनंदिन प्रवास करतात. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी आल्यास याठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे तात्काळ ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी या समस्येकडे लक्ष द्यावे. अन्यथा येणार्‍या काळात ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नवनाथ पवार, रवी ढगे, राहुल कवडे, स्वप्नील पवार, बाळासाहेब आढाव, संभाजी थेवरकर, अहमद शेख, संदीप थेवरकर, बाळासाहेब हापसे, उत्तम देठे, रवी आढाव, काकासाहेब देठे, तात्यासाहेब कवडे, संजय कवडे, सागर पवार, उत्तम आहेर, ऋषिकेश आढाव, नितीन गोसावी, राहुल देठे, ज्ञानेश्वर कवडे, सुरेश थेवरकर, सचिन थेवरकर, ऋषिकेश गोरे आदींसह लाभधारक शेतकर्‍यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com