महावितरणकडून शटडाऊन; नगरला एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा

महावितरणकडून शटडाऊन; नगरला एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शनिवार, 5 नोव्हेंबर रोजी महावितरण कंपनीकडून महत्वाच्या दुरूस्तीच्या कामांसाठी घेण्यात येणार्‍या शट डाऊनमुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागास एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.

शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच सारसनगर, बुरूडगाव रोड, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर सकाळी 11 नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. या भागास रविवारी (दि. 6) पाणीपुरवठा होणार आहे.

रविवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी या भागात पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. या भागातील पाणीपुरवठा हा रविवार ऐवजी सोमवारी (दि. 7) करण्यात येणार आहे.

सोमवारी पाणीपुरवठा होऊ घातलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको, स्टेशन रोड, विनायकनगर या भागात पाणीपुरवठा होणार नसून तो मंगळवारी (दि. 8) करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com