महाविकास आघाडीच्या 138 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

प्रशासनाला पूर्वसूचना न देता केले निषेध आंदोलन
महाविकास आघाडीच्या 138 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहरातील मुख्य रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाल्याने महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि मनसेच्यावतीने (MNS) शहरातील खड्डे (City Pits) मुरूम टाकून बुजवण्यात आले होते. व रस्त्यांच्या कामांना विरोध करणार्‍या कोल्हे गटाच्या नगरसेवकांचा निषेध (Protest of the corporators of Kolhe Group) करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे घटक पक्ष व मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे आंदोलन करताना कोविड इंसिडन्ट कमांडर यांची परवानगी न घेता, शासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच कोविड नियमांचे उल्लंघन करून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 138 जणांवर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली.

पोलीस कॉन्स्टेबल राम खारतोडे यांच्या फिर्यादीवरून सुनील वसंतराव गंगुले, मंदार सुभाष पहाडे, अनिल शिवाजी गायकवाड, सुनील जनार्धन फंड, गणेश अंबादास लकारे, भरत आसाराम मोरे, तुषार संजय पोटे, नवाज वहाब कुरेशी, कलविंदर हरितसिंग डडीयाल, निखील नंदकुमार डांगे, एकनाथ उर्फ बाल्या कैलास गंगुले, विरेन ज्ञानदेव बोरावके, ऋषीकेश सुनील खैरनार, राजेंद्र शंकरराव वाकचौरे, संदीप सावळेराम पगारे, संदिप शरद कपिले, विकास श्रीराम शर्मा,चंद्रशेखर सुधाकर म्हस्के, सुनील आसाराम साळुके, गगन पंडु हाडा, अजित मोहीद्दीन शेख, राहुल विजयकुमार देशपांडे, बाळासाहेब पिराजी साळुंके, फकिर महंमद कुरेशी, कार्तीक सरदार, शुभम ठकाजी लसुरे, धनंजय कांतीभाई कहार, अक्षय मिनीनाथ आग्रे, योगेश कांतिलाल गंगवाल, दिनेश मधुकर पवार, राहुल बाळकृष्ण देवळालीकर, संदिप सुरेश देवळालीकर, अशोक गंगाधर आव्हाटे, सुनील वामन शिलेदार, महेश रवींद्र उदावंत, रावसाहेब चंदू साठे, विजय प्रभाकर त्रिभुवन, इम्तीयाज रफिक पठाण सर्व रा. कोपरगाव व इतर अंदाजे 100 असे 138 पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर शहर पोलीस ठाण्यात गु.र.जि.नं. 279/2021 भादंवि कलम 341, 188(2), 269, 270 महाराष्ट्र पोलीस अधीनियम 37(1)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पो. नि. वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय पवार करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com