आघाडी सरकारच्या काळात निळवंडेच्या कामाला गती

जलसंपदा मंत्री पाटील यांचा दावा
आघाडी सरकारच्या काळात निळवंडेच्या कामाला गती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

निळवंडे धरणासाठी (Nilwande Dam) महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत 16 लक्ष 38 हजार क्युबीक मीटर खोदकाम आणि 14 लक्ष 56 हजार क्युबिक मीटर भराव काम झाले आहे. त्यामुळे निळवंडे धरणाचे (Nilwande Dam) काम वेगाने पूर्ण होत असल्याचा दावा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी केला आहे. आढळा मध्यम प्रकल्पाच्या (Adhala Project) कालव्याच्या दुरूस्तीसाठी 10 कोटी रूपये, देसवंडे (Deswande) येथे कोल्हापुरी पध्दतीचा बंधारा बांधणे, वावरस परिसरातील मुळा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पुलाचे बांधकाम करणे आणि गोदावरी नदीवरील (Godavari River) 84 कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या चालू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी आ. किरण लहामटे, आ. लहू कानडे, आ. संग्राम जगताप, माजी आ. नरेंद्र घुले आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रलंबीत प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी मंत्री पाटील यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

अकोले मतदारसंघातील उच्च पातळीच्या कॅनॉलचे बांधकाम, पश्चिमकडे वाहून जाणार्‍या पाण्यासाठी वळण बंधार्‍यांचे काम करणे, श्रीरामपुरातील प्रवरा कालव्याची डागडुजी करून त्याची वहन क्षमता वाढविणे, बंद पद्धतीने कॅनॉल बांधकाम करणे, मुळा नदीवरील (Mula River) कवठे गावाचा सतत फुटणार्‍या कालव्याची दुरूस्ती करणे, पुररेषा नदीपात्राच्या बाहेरून नेणे, नद्यांमधील पाणी नदीपात्र सोडून बाहेर जाऊ नये यासाठी नदी खोलीकरण आदी कामांचा यावेळी त्यांनी आढावा घेतला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com