अधिकार्‍यांसाठी ‘गटारी’

नागरी सोयींसाठी ‘वंचित’चा महापालिकेला इशारा
अधिकार्‍यांसाठी ‘गटारी’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महात्मा फुले (Mahatma Phule) घरकुल वसाहत काटवन खंडोबा (Gharkul colony Katwan Khandoba) येथील रहिवाशांना हक्काच्या नागरी सोयी उपलब्ध करून न दिल्यास मनपा आयुक्तांना (Municipal Commissioner) मैला मिश्रित पाण्याने आंघोळ घालणार असल्याचा इशारा (Hint) वंचित बहुजन आघाडीने (Deprived Bahujan Front) दिला आला.

काटवन खंडोबा (Katwan Khandoba) येथे महात्मा फुले वसाहत (Mahatma Phule Colony) या ठिकाणी घरकुल दिले पण तिथे वेळोवेळी साफसफाई व इतर जबाबदार्‍या या मनपाच्या आहेत, हे पलिका प्रशासन विसरले असावं. या ठिकाणी नाला साफसफाई होत नाहीत, मैल मिश्रित पाणी पिण्यासाठी येते, सेफ्टी टँक (Safety Tank) नाहीत, शौचालयाची सर्व घाण शेजारच्या मोकळ्या जागेत सोडलेले आहे. त्याची दुर्गंधी (Stinky) पसरल्यामुळे तेथील रहिवाश्यांना राहणे मुश्किल झाले आहे.

अहमदनगर महानगरपालिका (Ahmednagar Municipal Corporation) हद्दीमधील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेचा पालिकेला जो निधी प्राप्त होतो, त्याचा विनियोग योग्य व्हावा. तत्कालीन महापौर (Mayor) यांनी पालिकेतील असक्षम अधिकार्‍यांना हाताशी धरून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेचा फायदा हा ज्या वंचित घटकांना झाला पाहिजे होता तो झालेला दिसून येत नाही, त्याकरिता आपण स्वतः जातीने लक्ष घालून वंचित घटकांना त्यांच्या हक्काच्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

निवेदन देताना जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, महासचिव योगेश साठे, संघटक फिरोज पठाण, स्तुती सरोदे, शीतल शिराळे, विशाल साबळे, संजय जगताप भाऊ साळवे, प्रवीण ओरे, नयन आल्हाट, सचिन पवार आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com