राज्यातील 40 टक्के क्षेत्रावर राहुरी विद्यापीठाच्या वाणांची लागवड

14 वाण विकसित : 4 वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित
राज्यातील 40 टक्के क्षेत्रावर राहुरी विद्यापीठाच्या वाणांची लागवड

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahata

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने (Mahatma Phule Agricultural University) आत्तापर्यंत हरभर्‍याचे 14 वाण (Varieties of Gram) विकसित केलेले आहेत. यापैकी चार वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आलेले आहेत. आज राज्याच्या 40 टक्के क्षेत्रावर राहुरी विद्यापीठाच्या (Rahuri University) हरभरा वाणांची लागवड केली जाते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने (Mahatma Phule Agricultural University) विकसित केलेल्या हरभर्‍याच्या वाणांनी (Varieties of Gram) राज्यातील शेतकर्‍यांना समृध्द केले आहे.

सन 2010-11 च्या तुलनेत आज हरभर्‍याचे 86 टक्के क्षेत्र, 118 टक्के उत्पादन आणि 18 टक्क्यांनी उत्पादकतेत वाढ झालेली आहे. पारंपरिक पध्दतीमध्ये हरभरा हे पीक स्थानिक वाणांचे बियाणे वापरुन केले जात होते. परंतु अलिकडील काळात कृषी विद्यापीठाच्या (Mahatma Phule Agricultural University) संशोधनातून शेतकरी बांधवांना हवे असलेले जिरायत, बागायत आणि उशिरा पेरणीसाठी तसेच मर रोग प्रतिकारक्षम वाण उपलब्ध झाल्यामुळे हरभरा क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने (Mahatma Phule Agricultural University) आजपर्यंत हरभरा पिकामध्ये (Gram Crop) एकूण 14 वाण प्रसारीत केले असून यामध्ये देशी हरभर्‍याचे विजय, विशाल, दिग्वीजय, विक्रम, विक्रांत आणि विश्वराज तर काबुली हरभर्‍याचे विराट आणि कृपा हे अधिक उत्पादनक्षम वाण असून शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय आहेत. देशी वाणांच्या दाण्यांचा रंग आकर्षक असल्यामुळे चांगला बाजारभाव (Market Price) मिळतो. दिवसेंदिवस शेती उद्योगात होणार्‍या मजुरांच्या कमतरतेमुळे यांत्रिक पध्दतीने काढणी करता येईल, असा उंच वाढणारा देशी हरभर्‍याचा वाण फुले विक्रम हा विद्यापीठाने विकसित केला आहे. त्यामुळे कंबाईन हार्वेस्टरच्या सहाय्याने पिकाची काढणी करता येते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या हरभरा पिकातील वाणांमुळे राज्याचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यास मोलाचे योगदान झालेले आहे. 1985 मध्ये राज्याची हरभर्‍याची उत्पादकता प्रति हेक्टर 3.35 क्विंटल होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन सन 2020-21 मध्ये उत्पादकता 11 क्विंटल प्रति हेक्टर झालेली आहे.

- डॉ. शरद गडाख, संचालक संशोधन

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या विविध हरभरा वाणांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यानुसार दहा वर्षाच्या आतील वाणांचे केंद्रक बियाणापासून मुलभूत बियाणे तयार करुन महाबीज, शेतकरी उत्पादक कंपन्यांना पुरवठा केला जातो.

- डॉ. नंदकुमार कुटे, प्रमुख शास्त्रज्ञ, कडधान्य सुधार प्रकल्प.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात कडधान्य सुधार प्रकल्पाद्वारे विकसित करण्यात आलेल्या हरभरा पिकांच्या वाणांचे देशाच्या कडधान्य स्वयंपूर्णतेमध्ये महत्वाचे योगदान आहे. राज्यात प्रथमच यांत्रिक पध्दतीने काढणी करण्यासाठी फुले विक्रम हा वाण प्रसारित केला आहे. हरभरा पिकामध्ये जिरायत, बागायत आणि उशिरा पेरणीसाठी एकूण 14 वाण प्रसारित केल्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांची आर्थिक प्रगती झाली असून हरभरा उत्पादनामध्ये राज्य दुसर्‍या क्रमांकावर आहे.

- कुलगुरु डॉ.पी.जी.पाटील

Related Stories

No stories found.