राहुरी विद्यापीठ परिसरात रोड रोमियोंचा उच्छाद

बंदोबस्त करण्याची मागणी
राहुरी विद्यापीठ परिसरात रोड रोमियोंचा उच्छाद

राहुरी विद्यापिठ |वार्ताहर| Rahuri Vidyapith

राहुरीच्या (Rahuri) महात्मा फुले कृषी विद्यापीठ (Mahatma Phule Agricultural University) मुख्य प्रवेशद्वाराजवळ व शाळा महाविद्यालय आवारात विद्यार्थिनींची छेड (Teasing of Female Students) काढणार्‍या सडक छाप रोडरोमियोंनी (Roadromiyo) उच्छाद मांडला आहे. त्यांच्या या उपद्रवला विद्यार्थिनी व पालक हैराण झाले आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

राहुरी विद्यापीठाचे (Mahatma Phule Agricultural University) मुख्य प्रवेशद्वार हे रोड रोमियो महाविद्यालयीन रस्ता व दुकान चाळ या भागात उभे राहतात. येथे त्यांचे थांबे तयार झाले आहे. शाळा कॉलेज सुटल्यानंतर व शाळा भरायच्या अगोदर हे रोडरोमिओ महाविद्यालयातून घरी चाललेल्या विद्यार्थिनींची टू व्हीलर वर पाठलाग करत डबल सीट व ट्रिपल सीट सुसाट वेगाने येत विद्यार्थिनींची छेड काढत असल्याने मागील काही दिवसापूर्वी या शाळा कॉलेजमधील काही विद्यार्थिनींना आपले शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली होती. त्यामुळे या रोडरोमियांचा बंदोबस्त केला नाही तर विद्यापीठ परिसरात भिषण घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात (Mahatma Phule Agricultural University) शिक्षण घेण्यासाठी राहुरी तालुक्याच्या (Rahuri Taluka) कानाकोपर्‍यातून ग्रामीण भागातील विद्यार्थिनी सायकल वर ये-जा करत असतात. या विद्यार्थिनींना रस्त्यावर अडवून छेड (Teasing of Female Students) काढण्याच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत याकडे विद्यापीठ प्रशासन पोलिसांचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पालक वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली असून नाराजी व्यक्त होत आहे. काही विद्यार्थिनींनी या रोडरोमिओ यांची चांगलीच धास्ती घेतली असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.

Related Stories

No stories found.