राहुरी विद्यापीठाला संशोधनासाठी भरीव निधीची तरतूद करू

ना. डॉ. विश्वजित कदम : सुसंवाद बैठकीत शास्त्रज्ञांबरोबर साधला संवाद
राहुरी विद्यापीठाला संशोधनासाठी भरीव निधीची तरतूद करू

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे (Mahatma Phule Agricultural University) कृषी क्षेत्रातील (Agricultural sector) योगदान लक्षात घेता कृषीपंढरी समान राहुरी कृषी विद्यापीठाला (Rahuri Agricultural University) संशोधनासाठी भरीव निधीची (Fund) तरतूद केली जाईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम (Minister of State for Agriculture Dr. Viswajit Kadam) यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात (Mahatma Phule Agricultural University) विद्यापीठ शास्त्रज्ञ सुसंवाद बैठकीला मार्गदर्शन करताना ना. डॉ. कदम (Minister of State for Agriculture Dr. Viswajit Kadam) बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील (Vice Chancellor Dr. P.G. Patil) होते. याप्रसंगी फलोत्पादन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, (Minister of State for Horticulture Aditi Tatkare) नगरविकास व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State for Urban Development and Energy Prajakt Tanpure), आ. रोहीत पवार (MLA Rohit Pawar), आ. लहू कानडे (MLA Lahu Kanade), कार्यकारी परिषद सदस्य आ. नरेंद्र दराडे (Executive Council Member Narendra Darade), उपस्थित होते.

ना.डॉ. कदम (Minister of State for Agriculture Dr. Viswajit Kadam) म्हणाले, सध्याचा हवामान बदल लक्षात घेता कृषी विद्यापीठांनी (Agricultural University) शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सध्याची स्थिती लक्षात घेता सेंद्रिय शेतीच्या संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठांनी संशोधन (Research by Agricultural Universities) बाबींवर पेटंटसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आपले संशोधन हे उच्चदर्जाच्या जर्नल्समध्ये प्रकाशित करावे असे ते म्हणाले. याप्रसंगी कुलगुरु डॉ. पाटील (Vice Chancellor Dr. P.G. Patil) यांनी विद्यापीठाचा आढावा सादर केला. कृषी विद्यापीठाचे कार्य सक्षमपणे चालविण्यासाठी प्राध्यापक व कर्मचारी यांच्या रिक्त जागा भरणे अत्यंत गरजेचे आहे. यावेळी कुलगुरुंच्या हस्ते अतिवृष्टी पुरग्रस्तांसाठी विद्यापीठ कर्मचार्‍यांचा एक दिवसाचा वेतनाचा रुपये एकोणचाळी लाख 88 हजार 82 रुपये रकमेचा धनादेश मुख्यमंत्री निधीसाठी कृषी राज्यमंत्र्यांकडे सुपूर्त केला.

बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. शरद गडाख (Dr. Sharad Gadakh) यांनी केले. कुलसचिव प्रमोद लहाळे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी केले. बैठकीला विद्यापीठाचे अधिकारी, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख व शास्त्रज्ञ उपस्थित होते. सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांनी उद्यानविद्या विभागाच्या प्रक्षेत्रावरील विविध फळपिकांचे प्रात्यक्षिक, औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, कोरडवाहू फळपिके संशोधन प्रकल्प आणि उद्यानविद्या रोपवाटीका या प्रकल्पांना भेटी दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com