महात्मा फुले कृषी विद्यापीठ
महात्मा फुले कृषी विद्यापीठ

कुलगुरूंनी अनधिकृत विद्यार्थ्यांना दिली कारवाईची तंबी

अधिकृत विद्यार्थी व पालक यांची कुलगुरू यांच्याशी चर्चा || महात्मा फुले कृषी विद्यापीठ विद्यार्थी हल्ला प्रकरण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरीच्या (Rahuri) महात्मा फुले कृषी विद्यापीठात (Mahatma Phule Agricultural University) रविवार दि.31 जुलै रोजी पहाटे 1 ते 3 वाजेच्या सुमारास अनाधिकृत विद्यार्थ्यांकडून अधिकृत विद्यार्थ्यांवर हल्ला (Student Attack) करुन कुलगुरुच्या कार्यालयावर दगडफेक (Chancellor Office Stone Throw) करुन कार्यालयाच्या काचा फोडल्या. अधिकृत विद्यार्थ्यांवर दगडफेक (Stone Throw) केली. या घटनेनंतर रविवारी भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. प्रकाश पाटील (Vice Chancellor Dr. Prakash Patil) यांची भेट घेतली. समवेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही कुलगुरूंबरोबर चर्चा केली. त्यानंतर हे अधिकृत विद्यार्थी पुन्हा आपआपल्या रूमवर परतले आहेत.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयावर संतप्त विद्यार्थ्यांकडून दगडफेक

काल या घटनेवर कृषी विद्यापीठ (Mahatma Phule Agricultural University) प्रशासनाने सावध भूमिका घेत चिघळलेली परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली. यावेळी संबंधित अधिकार्‍यांनी दगडफेक (Stone Throw) करणार्‍या अनाधिकृत विद्यार्थ्यांना चांगलीच तंबी दिली. सुरक्षा अधिकारी जी.आर.शेटे यांनी अनाधिकृत विद्यार्थ्यांवर राहुरी पोलिस ठाण्यात (Rahuri Police Station) गुन्हा दाखल का केला नाही? सुरक्षा रक्षक प्रमुख शेटे यांच्यावर गुन्हा दाखल करु नये म्हणून दबाव आणला का? कुलगुरुंनी अनाधिकृत विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल का केला नाही? असा सवाल विचारला जात आहे. अधिकार्‍यांवर दबाव असल्याची चर्चा होत आहे.

दरम्यान, पुन्हा अशी घटना घडल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई (Student Action) करण्याचा इशारा (Hint) विद्यापीठ प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे तूर्त या घटनेवर पडदा पडला आहे. वस्तीगृहात (Hostel) राहणार्‍या अधिकृत विद्यार्थ्यांवर अनाधिकृत विद्यार्थ्यांनी हल्ला केल्याने अधिकृत विद्यार्थ्यांनी कुलगुरू कार्यालयात आसरा घेतला. तर अनधिकृत विद्यार्थ्यांच्या दुसर्‍या गटाने कुलगुरुंच्या कार्यालयावर दगडफेक केली. अनधिकृत विद्यार्थ्यांच्या गटापासुन अधिकृत तथा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विद्यापिठाच्या सुरक्षा रक्षकांमुळे अधिकृत विद्यार्थ्यांचा जीव वाचला आहे.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (Rahuri Mahatma Phule Agricultural University) अधिकृत आणि अनाधिकृत विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये रविवारी पहाटे दगडफेक झाल्याने एकच खळबळ उडाली असुन कृषि पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणेसाठी या विद्यापीठात राज्यभरातून व देशातून ऑनलाईन विद्यार्थ्यांची निवड केली जाते. अधिकृत आणि अनधिकृत विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वादाची ठिणगी पडली.

अनाधिकृत विद्यार्थ्यांची संख्या अधिकृत विद्यार्थ्यांपेक्ष्या जास्त असल्याने अधिकृत विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी होस्टेलपासून जवळच असलेल्या कुलगुरू कार्यालयात धाव घेत आसरा घेतला. विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी अधिकृत विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकाच्या कार्यालयात कोंडून घेवून जीव वाचविला. सुरक्षा रक्षक अनाधिकृत विद्यार्थ्यांना सामोरे गेले. सुरक्षा रक्षकांपेक्षा अनाधिकृत विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांनी सुरक्षा रक्षकांना न जुमानता कुलगुरुंच्या कार्यालयावर तुफान दगडफेक केली. यात सुरक्षा रक्षकांनाही दगडाचा मार लागला असला तरी वरीष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशामुळे गप्प बसण्याची वेळ आली आहे. कुलगुरु यांच्या कार्यालयाबाहेर कार्यरत असणार्‍या सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे.

घटना घडल्या पासुन अधिकृत विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेत आहेत. अनाधिकृत विद्यार्थी आमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. अशी मनात भिती निर्माण झाली आहे. कृषी विद्यापीठातील घटनेचे वृत्तांकन सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पालकांकडून भ्रमणभाषवरुन चौकशी करण्यात येत आहे. तर काही पालकांनी काल सोमवारी सकाळी आपल्या पाल्यांना भेट देवून झालेल्या घटनेची माहिती घेतली. पालकांनी थेट कुलगुरुंनाच धारेवर धरले. माञ घरी जाण्यापूर्वी विद्यापीठाच्या प्रशासनास आमच्या पाल्याच्या केसालाही धक्का लागला तर कुलगुरुसह संबधित अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची तंबी देऊन गेले. झालेल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी अधिकृत विद्यार्थ्यांनी केली आहे.

अनाधिकृत विद्यार्थ्यामुळे वस्तीगृहात राहणे धोक्याचे झाले आहे. आम्हाला सुरक्षा रक्षकांनी वाचवले नसते तर आमचा खुन झाला असता. त्याला जबाबदार कोण? असा सवाल संतप्त विद्यार्थ्यांकडून विचारला गेला.आम्ही फी भरून परीक्षा देऊन आलो तरी आम्हाला असे चोरासारखे लपून बसावे लागते अशी खंतही विद्यार्थ्यांनी बोलून दाखविली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com