
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (Mahatma Phule Agricultural University) कुलगुरू कार्यालयावर (Office of the Vice-Chancellor) रविवार दि. 31 जुलै रोजी पहाटे 1 ते 3 च्या दरम्यान संतप्त विद्यार्थ्यांच्या (Angry Students) एका गटाकडून कुलगुरू कार्यालयात (Office of the Vice-Chancellor) आसरा घेतलेल्या दुसर्या गटावर दगडफेक (Stone Throwing) करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या दोन गटामध्ये रात्री दगडफेक (Stone Throwing) झाल्याने एकच खळबळ उडाली.
घटनेची अधिक माहिती अशी की, कृषि पदविका अभ्यासक्रम (Diploma Course in Agriculture) पूर्ण करण्यासाठी या विद्यापीठात राज्यभरातून (State) व देशातून (Country) ऑनलाईन विद्यार्थ्यांची निवड केली जाते. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांना 70 हजार रुपये फी भरावी लागते. या विद्यापीठात एकूण 168 प्रवेश मर्यादा आहे. तथापि या विद्यापीठाच्या (Mahatma Phule Agricultural University) हॉस्टेलमध्ये जवळपास 500 विद्यार्थी अनधिकृतपणे वास्तव्य करून राहात असून त्यांना कुठलीही हॉस्टेल किंवा मेस फी नाही. त्यामुळे अधिकृत आणि अनधिकृत विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून रात्री वादाची (Dispute) ठिणगी पडली.
अनधिकृत विद्यार्थ्यांची संख्या अधिकृत विद्यार्थ्यांपेक्ष्या जास्त असल्याने अधिकृत विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी हॉस्टेल पासून जवळच असलेल्या कुलगुरू कार्यालयात धाव घेत आसरा घेतला. या मुलांना मारण्यासाठी अनधिकृत 500 विद्यार्थ्यांच्या गटाने कुलगुरू कार्यालयावर (Office of the Vice-Chancellor) जोरदार दगडफेक (Stone Throwing) करीत हल्ला (Attack) केला. तथापि या कार्यालयाबाहेर कार्यरत सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
घडल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे आप्पासाहेब ढुस यांनी केली आहे. ढुस म्हणाले, काही विद्यार्थ्यांनी कुलगुरु कार्यालयात असलेल्या सुरक्षा रक्षक शेटे यांच्या केबिनमध्ये आसरा घेतला होता. हे विद्यार्थी खूप घाबरलेले होते. आम्हाला वाचवा म्हणत होते. आमचा मर्डर झाला तर त्याला जबाबदार कोण असे विचारीत होते. आम्ही फी भरून परीक्षा देऊन आलो तरी आम्हाला असे चोरा सारखे लपून बसावे लागते अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली.
तसेच काही विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून घरी निघून जाण्याची भाषा करीत होती. तसेच या विद्यापीठात या 500 विद्यार्थ्यांकडून मिळणार्या चिरीमिरीसाठी त्यांना सांभाळणेत विद्यापीठाचा वेळ वाया जात असून विद्यापीठाचा संशोधन हा मुख्य हेतू त्यामुळे बाजूला पडला असल्याची खंतही हे विद्यार्थीनी बोलून दाखविली. या सर्व घटनेची मुख्यमंत्री महोदयांनी उच्यस्तरीय चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी ढुस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे सांगितले. दरम्यान कुलगुरू येईपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असे सांगितले.