राहुरी कृषी विद्यापीठ येथे होणारी सैन्यभरती लांबणीवर

राहुरी कृषी विद्यापीठ येथे होणारी सैन्यभरती लांबणीवर
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

इंडियन आर्मीच्या (Indian Army) वतीनं अहमदनगरमधील (Ahmednagar) महात्मा फुले कृषी विद्यापीठ (Mahatma Phule Agricultural University), राहुरी (Rahuri) येथे सैन्य भरतीचं आयोजन (Organizing military recruitment) करण्यात आलं होतं. 7 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान सैन्य भरती (military recruitment) घेण्यात येणार होती. करोनाच्या तिसर्‍या लाटेची भीती (Fear of Corona third wave) आणि करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता भरती प्रक्रिया स्थगित (Recruitment process postponed) करण्यात आल्याची माहिती पुणे येथील लष्कराचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील युवक (Maharashtra Youth) मोठ्या प्रमाणात सैन्यात भरती (military recruitment) होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न पाहत असतात. भारतीय सैन्यात भरती (Indian military recruitment) होण्यासाठी विद्यार्थी आणि तरुण सातत्यानं प्रयत्न करत असतात. इंडियन आर्मीच्यावतीनं देशभर भरती प्रक्रिया राबवली जाते. या भरती प्रक्रियेचा भाग म्हणून होणारी सैन्य भरती लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही भरती सोल्जर जनरल ड्युटी (Soldier General Duty), नर्सिगं असिस्टंट (Nursing Assistant) आणि सोल्जर क्लार्क (Soldier Clark), सोल्जर ट्रेडसमन (Soldier Tradesman)आणि सोल्जर टेक्निकल (Soldier Technical) या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. भरतीची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com