राहुरी विद्यापीठातील घेवडा पिकाच्या 'या' वाणांना शेतकर्‍यांची पसंती

राहुरी विद्यापीठातील घेवडा पिकाच्या 'या' वाणांना शेतकर्‍यांची पसंती
Raju

राहुरी |तालुका प्रतिनिधी|Rahuri

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत (Mahatma Phule Agricultural University) विभागीय कृषी संशोधन केंद्र (Divisional Agricultural Research Center), गणेशखिंड, पुणे येथून विकसित केलेले घेवड्याचे (Ghevda) ‘वरुण’ (Varun) आणि ‘फुले राजमा’ (Phule Rajama) हे कडधान्य पिकाचे वाण (Cereal crop varieties) शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरीप आणि रब्बी (Rabbi) या दोन्ही हंगामात सातारा (Satara), पुणे (Pune), सांगली (Sangali) आणि कोल्हापूर (Kolhapur) या जिल्ह्यांमध्ये या पिकाखाली 50 हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे.

कमी कालावधीत अधिक उत्पादनक्षमता असणार्‍या या वाणांचे सातारा जिल्ह्यातील (Satara District) कडधान्य पिकांतर्गत क्षेत्र 30 हजार हेक्टर असून पुणे, सांगली, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील बीड (Beed) जिल्ह्यामध्ये या वाणाचे क्षेत्र वाढत आहे. या क्षेत्रापैकी 90 टक्के क्षेत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वरुण (Varun) व फुले राजमा (Phule Rajama) या वाणाखाली आहे. महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला प्रचलीत वाघ्या हा वाण मोठ्या प्रमाणात घेतला जात होता.

परंतु या वाणापेक्षा अधिक उत्पादनक्षम आणि बाजारभाव मिळवून देणारा वरुण हा वाण विभागीय कृषी संशोधन केंद्र (Divisional Agricultural Research Center), गणेशखिंड, पुणे

येथून 2001 मध्ये प्रसारीत करण्यात आला आणि काही वर्षातच वाघ्या वाणाचे क्षेत्र वरुण वाणाने व्याप्त केले. वरुण (Varun) हा कमी कालावधीत म्हणजे 70 ते 75 दिवसात येणारा, मध्यम ते हलक्या जमिनीत कमी पाण्यावर अधिक उत्पादन देणारा वाण आहे. फिकट पांढर्‍या रंगाच्या दाण्यावर तपकिरी रंगाची छटा असणार्‍या या वाणामध्ये प्रथिनाचे प्रमाण 23.30 टक्के व कार्बोदकाचे प्रमाण 61 टक्के आहे. हा वाण खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात घेतला जात असल्याने लागवडीखालील क्षेत्र प्रकर्षाने वाढलेले दिसून येते.

फुले राजमा (Phule Rajama) हा वरुण वाणापेक्षा अधिक उत्पादनक्षम असणारा वाण वाघ्या आणि जीआरबी-9710 या वाणांच्या संकरातून 2017 मध्ये प्रसारीत करण्यात आला. या वाणाचा कालावधी 80 ते 82 दिवसाचा असून प्रथिनाचे प्रमाण 23.38 टक्के व कार्बोदकाचे प्रमाण 63.93 टक्के इतके आहे. मर आणि विषाणूजन्य रोगास मध्यम प्रतिकारक्षम असणारा व फिक्कट पांढर्‍या रंगाच्या दाण्यावर आकर्षक गुलाबी रंगाची छटा असणार्‍या या वाणास वरुण वाणापेक्षा चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे या वाणाखालील क्षेत्रसुध्दा वाढत आहे.

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) कमी कालावधीत अधिक उत्पादनक्षमता असणार्‍या या पिकाची (Crops) सरासरी उत्पादकता 11 ते 12 क्विंटल प्रतिहेक्टरी एवढी आहे. रब्बी हंगामात (Rabbi Season) पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार पाण्याच्या तीन पाळ्या दिल्यास उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ होते. इतर पिकांच्या (Crops) तुलनेत या पिकास रुपये 6 ते 7 हजार प्रति क्विंटल दर मिळत असल्याने हे पीक शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com