राहुरी विद्यापीठात 21 दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम
राहुरी कृषी विद्यापीठ

राहुरी विद्यापीठात 21 दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

बदलत्या हवामानाचा कृषी उत्पादनावर (Agricultural production of changing climate) व अन्नसुरक्षेवर परिणाम (Effects on food security) होत आहे. एक टक्का तापमान वाढीमुळे पाच टक्क्यापर्यंत उत्पादनात घट होते. यासाठी सर्व विस्तार यंत्रणा, शास्त्रज्ञ, विद्यार्थी (Student) व शेतकरी हे हवामान अद्ययावत शेतीमध्ये साक्षर झाले पाहिजे. असे प्रतिपादन हैद्राबाद (Hyderabad) येथील मॅनेज संस्थेचे महासंचालक डॉ. पी. चंद्रशेखरा (Dr. P. Chandrasekhara) यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील (Mahatma Phule Agricultural University) जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राच्या वतीने हवामान स्मार्ट शेतीसाठी धोरणे, संस्था व विपणन या विषयावर 21 दिवसांचे ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यासक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. किरण कोकाटे होते. यावेळी नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. व्ही.व्ही. सदामते, कृषी विपणन राष्ट्रीय संस्थेच्या सहाय्यक संचालिका डॉ. सुची माथुर, डॉ. मिलिंद अहिरे, डॉ. सुनील गोरंटीवार उपस्थित होते.

याप्रसंगी प्रशिक्षणार्थी डॉ. स्वाती कोत्रा, डॉ. राजकिशोर भटनागर आणि डॉ. पंकजकुमार ओझा यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ऑनलाईन प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रशिक्षणामध्ये 27 तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या 21 दिवसीय प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींनी वैयक्तिक प्रकल्प आणि चमू प्रकल्प सादर केले होते. यामध्ये उकृष्ट प्रकल्पांना प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक देण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे आणि डॉ. सेवक ढेंगे यांनी केले. आभार डॉ. संजय सपकाळ यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com