कर्जमाफी : ‘त्या’ शेतकर्‍यांना 15 नोव्हेंबरपर्यंत मुदत

कर्जमाफी : ‘त्या’ शेतकर्‍यांना 15 नोव्हेंबरपर्यंत मुदत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधील (Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme) काही पात्र शेतकरी वंचित (Farmers Deprived) राहिले होते. अशा शेतकर्‍यांची यादी सरकारने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. नव्याने यादीत आलेले व यापुर्वीच्या यादीत शिल्लक राहीलेल्या शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) करणे बाकी आहे. या सर्व शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. शेतकर्‍यांनी वेळेत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आव्हान जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर (District Deputy Registrar Digvijay Aher) यांनी केले आहे.

राज्य सरकारने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme) पात्र शेतकर्‍यांची नवीन यादी जाहिर केली आहे. या शेतकर्‍यांनी नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र (Your Government Service Center) किंवा जिल्हा बँकेच्या शाखेत (District Bank Branch) जावुन 15 नोव्हेंबर 2021 पूर्वी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, वेळेत आधार प्रमाणीकरण केले नाही तर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहणार असल्याचे आहेर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख 86 हजार 861 शेतकर्‍यांना एक हजार 742 कोटी कर्जमाफीचा लाभ मिळाल्याने कर्जमाफी योजनेमध्ये जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com