Maharashtra Unlock : नगर जिल्ह्यात काय सुरु काय बंद?, जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Unlock : नगर जिल्ह्यात काय सुरु काय बंद?, जाणून घ्या एका क्लिकवर

अहमदनगर | Ahmednagar

राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्यावरून झालेल्या मोठ्या गोंधळानंतर राज्य सरकारने अनलॉकचे आदेश जारी केले आहेत.

राज्यात सोमवारपासून ५ टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाची सक्रिय रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत.

दरम्यान, करोना पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के आणि २५ टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असल्याने पहिल्या टप्प्यात अहमदनगर जिल्हा अनलॉक होत आहे. यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच सोमवारपासून होईल.

मॉल, थीएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहेसुद्धा नियमितपणे सुरू. रेस्टॉरंटसाठीही परवानगी. लॉकल सेवा पूर्ववत होईल. मात्र स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागास निर्बंध घालण्याची मुभा असेल. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खाजगी कार्यालये उघडण्याची मुभा. शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील. विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल. लग्न सोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतेही बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत असेल. जमावबंदीही नसेल.

मात्र स्थानिक स्थितीनुसार प्रशासनाने निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. नगर जिल्ह्या प्रशासनाने आढावा घेण्याची तयारी सुरू केली आहे. शनिवारी दुपारी पालकमंत्री नगरमध्ये आहेत. ते प्रशासनाकडून आढावा घेणार आहेत. त्यांच्याकडून नगर जिल्ह्याबाबत पुढील घोषणा होण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com