SSC Result 2021 : नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९.९७ टक्के

SSC Result 2021 : नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९.९७ टक्के

अहमदनगर | Ahmednagar

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या (Corona Second Wave) प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या (Maharashtra SSC Exam) परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल (SSC result) आज, शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. यात नगर जिल्ह्याचा निकाल ९९.९७ टक्के लागला (SSC Result Ahmednagar). दहावीच्‍या परीक्षेसाठी नगर जिल्‍ह्यातून ७० हजार ५८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या पैकी ७० हजार ५८५ विद्यार्थ्यांचे मूल्‍यांकन करून बोर्डाकडे पाठविले होते. त्‍यानुसार आज लागलेल्‍या निकालात जिल्‍ह्यातील ७० हजार ५८९ विद्यार्थ्यांपैकी ७० हजार ५६६ विद्यार्थी उत्‍तीर्ण झाले आहेत. तर १९ विद्यार्थी अनुत्‍तीर्ण झाले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com